• Download App
    PM Modi पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अजित डोवाल यांच्यासह तिन्ही सैन्यदल प्रमुखांची अत्यंत महत्त्वाची बैठक!!

    PM Modi पंतप्रधान मोदी, राजनाथ सिंह, अजित डोवाल यांच्यासह तिन्ही सैन्यदल प्रमुखांची अत्यंत महत्त्वाची बैठक!!

    BSF, NSG, CRPF आणि CISF अधिकाऱ्यांची केंद्रीय गृह मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक!!

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : पहलगाम मध्ये दहशतवाद्यांचा हल्ला झाल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध कठोर कारवाई करण्यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सरकार वेगवेगळे पर्याय तयार करत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सह सैन्य दलाच्या तीन प्रमुखांबरोबर आज पुन्हा एकदा बैठक घेतली. या बैठकीला CDS जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग उपस्थित होते.

    त्याच वेळी केंद्रीय गृह मंत्रालयात बॉर्डर सिक्युरिटी फोर्स (BSF), नॅशनल सिक्युरिटी गार्ड (NSG), सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (CRPF), सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स (CISF) या अंतर्गत सुरक्षा यंत्रणांच्या प्रमुखांची बैठक झाली.



    पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान विरोधात करायच्या कठोर उपाय योजनांच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत कायदा आणि सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी एकाच वेळी पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी वेगवेगळ्या सुरक्षा यंत्रणांच्या बैठका घेतल्या‌.

    मात्र, पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीचे आणि गृह मंत्रालयात झालेल्या बैठकीचे कुठलेही तपशील बाहेर आलेले नाहीत.

    एकीकडे काँग्रेसने सोशल मीडियावर जिहादी मानसिकतेतून पंतप्रधान नरेंद्र मोदींना “गायब” केले असताना स्वतः ते आणि संरक्षण मंत्रालयातील आणि गृह मंत्रालयातील मंत्री आणि अधिकारी विविध महत्त्वपूर्ण आणि गोपनीय बैठका घेत आहेत. पाकिस्तान विरुद्ध कायमची कठोरची कारवाई करायचा मोदी सरकारचा इरादा असून त्या दिशेने ठाम पावले उचलली आहेत. मात्र, या कुठल्याच बैठकांमधले कुठलेही तपशील अधिकृतपणे बाहेर आलेले नाहीत किंवा कुठलीही माहिती “लीक” झालेली नाही.

    PM Modi chairs a meeting with Defence Minister, NSA, CDS and chiefs of all the Armed Forces.

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Marathwada : मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना 346 कोटी 31 लाख 70 हजारांचा दिलासा; अध्यादेश जारी, दिवाळीनंतरच खात्यात येणार

    Raj Thackeray : राज ठाकरेंचा 96 लाख बोगस मतदारांचा आकडा खोटा, भाजपचा पलटवार; संभाव्य पराभवाच्या अनेक कारणांपैकी एक कारण असल्याचा आरोप

    Navnath Ban : नवनाथ बन म्हणाले- मोदींनी कधीही बाळासाहेबांवर टीका केली नाही; राऊतांची चिखलफेक जनता ओळखून; 96 लाख बोगस मतदारांचा एकही पुरावा नाही