• Download App
    रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात गंभीर पूर परिस्थिती, मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली, पीएम मोदींनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा । PM Modi Call CM Thackeray Over maharashtra flood, many districts mumbai sangli akola kolahpur others heavy rainfall

    Maharashtra Flood : रत्नागिरी, रायगडात गंभीर पूरस्थिती, मदतीसाठी शासनाची संपूर्ण यंत्रणा उतरली, पीएम मोदींनी मुख्यमंत्र्यांशी केली चर्चा

    Maharashtra Flood : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. दरम्यान, राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून या आपत्तीच्या काळात राज्याला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. PM Modi Call CM Thackeray Over maharashtra flood, many districts mumbai sangli akola kolahpur others heavy rainfall


    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : पूरग्रस्त रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात आता बचावकार्यासाठी नौदल, सैन्य दलाच्या तुकड्याही उतरल्या असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सातत्याने जिल्ह्यांतील अद्ययावत माहिती घेत आहेत. दरम्यान, राज्यातील पूर परिस्थितीसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून या आपत्तीच्या काळात राज्याला सर्वतोपरी मदत देण्याचे आश्वासन दिले आहे. पीएम मोदी आणि मुख्यमंत्र्यांदरम्यान पूरपरिस्थितीवर चर्चा झाली. राज्य शासनामार्फत सुरू असलेले बचावकार्य व उपाययोजनांची माहिती मुख्यमंत्री ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींना दिली. बचाव आणि मदत कार्यात केंद्र सरकार राज्याला सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासन पंतप्रधानांनी यावेळी दिले.

    हवामान खात्याचा इशारा

    भारतीय हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानंतर कोकण विभागात रायगड, रत्नागिरी, पालघर, ठाणे, या जिल्ह्यांमध्ये पूरपरिस्थती निर्माण झाली. रायगड, ठाणे, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्ह्यांमधील अनेक नद्या धोका पातळीवर वाहत असल्याने एनडीआरएफ, तटरक्षक दल, नौदल तसेच सैन्यदलाच्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. पूर परिस्थितीत मदत व बचावकार्य करण्यासाठी शासनाकडून तात्काळ उपाययोजना सुरू आहेत अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.

    तसेच पुणे विभागातील संभाव्य पूरपरिस्थिती लक्षात घेवून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये सुध्दा एनडीआरएफच्या तुकड्या तैनात करण्यात येत आहे.रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर मार्फत मदत व बचावकार्य करण्यात येत आहे.

    एनडीआरएफच्या २ तुकड्या कोल्हापूर जिल्ह्यात दाखल

    कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु असून जिल्ह्यातील बहुतांशी नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्यासाठी एनडीआरएफच्या 2 तुकड्या जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. एक तुकडी शिरोळ तालुक्यात तर दुसरी तुकडी करवीर तालुक्यात पोहोचली आहे. आयआरबी बोट, गोताखोर सेट, लाईफ जॅकेट, रेस्क्यू रोप आदी अत्याधुनिक साधनांसह प्रत्येकी २५ जवानांची २ पथके सज्ज झाली आहेत.

    PM Modi Call CM Thackeray Over maharashtra flood, many districts mumbai sangli akola kolahpur others heavy rainfall

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Chinese app : भारताचा चुकीचा नकाशा दाखवणारे चिनी अॅप हटवण्याचे सरकारने गुगलला दिले आदेश

    Pope Francis : ख्रिश्चन धर्मगुरू पोप फ्रान्सिस यांचे निधन

    Bokaro : बोकारोमध्ये एक कोटी इनामीसह आठ नक्षलवादी ठार!