• Download App
    साताऱ्यातील अतित गावातील प्लास्टिक कंपनी भीषण आगीमध्ये खाक; जीवितहानी नाही|Plastic company in Atit village in Satara burnt to ashes; No casualties

    साताऱ्यातील अतित गावातील प्लास्टिक कंपनी भीषण आगीमध्ये खाक; जीवितहानी नाही

    विशेष प्रतिनिधी

    सातारा – समर्थगाव (अतीत) सातारा येथे रिसायकलिंग करणाऱ्या कंपनीस रविवारी दुपारी भीषण आग लागली. कामगारांना सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.अग्निशामक दलाच्या चार गाड्यांनी आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. आगीत कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे.Plastic company in Atit village in Satara burnt to ashes; No casualties

    महामार्गावरील निसराळे फाटा येथून पाली- सासपडे-तारळेकडे जाणाऱ्या रस्त्यावर समर्थगाव (अतीत) गावच्या हद्दीत डोंगराच्या पायथ्याला अमेझिया व्हिजन इन्व्हायरमेंटल प्रा.ली. ही कंपनी आहे. या कंपनीत भांगारातील प्लास्टिकवर रिसायकलिंग करण्याचा प्लान्ट आहे. रविवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास कंपनीस मोठी आग लागली.



    रविवार कामगारांना सुट्टी असल्याने कंपनीत कोणीही नव्हते. वाऱ्यामुळे आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले.बोरगाव पोलिसांसह सातारा नगरपालिका,कराड नगरपालिका,अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना व जयवंत शुगरच्या अग्निशामक दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या.सायंकाळी उशिरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळविण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू होते.

    Plastic company in Atit village in Satara burnt to ashes; No casualties

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Maharashtra government : महाराष्ट्र सरकारचे गृहनिर्माण धोरण जाहीर : विद्यार्थी, ज्येष्ठांच्या गृहप्रकल्पांना मुद्रांक, एफएसआयमध्ये सवलत

    Vijaykumar Ghadge : छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे थेट अजित पवारांना विचारणार जाब; “माझं चुकलंच काय?” असा सवाल करत मुंबईकडे प्रस्थान

    Girish Mahajan : “गुलाबी गप्पा” कोणासोबत रंगल्या आहेत? गिरीश महाजन यांचा एकनाथ खडसे यांच्यावर जोरदार हल्लाबोल