- पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासरसाई येथे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे. Pimpri: Vehicles transporting sugarcane banned for a certain period of time; Order issued by Deputy Commissioner of Police Anand Bhoite
विशेष प्रतिनिधी
पुणे : गेल्या काही दिवसांमध्ये उसाच्या ट्रॉलींना अपघातही झाले आहेत. परिणामी वाहतुकीस अडथळा होऊन कोंडी होते.या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त आनंद भोईटे यांनी पिंपरी -शहरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना ठराविक वेळेसाठी बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत.
पिंपरी – चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कासरसाई येथे श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखाना आहे.त्यामुळे शहरातून ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांची नेहमी वर्दळ असते.तसेच या वाहनांमध्ये उसाचे जास्त वजन असल्याने तसेच, ट्रॅक्टरला एकापेक्षा जास्त ट्रॉली जोडल्याने ही वाहने सावकाश धावतात.त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो.
ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांना सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत वाहतुक बंद राहणार आहे. त्यानंतर दुपारी १ ते सायंकाळी ५ पर्यंत शहरातून ऊस वाहतुक करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर पुन्हा सायंकाळी ५ ते रात्री ९ पर्यंत बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर रात्री ९ ते सकाळी ९ पर्यंत ऊस वाहतूक करू शकतात.
Pimpri : Vehicles transporting sugarcane banned for a certain period of time; Order issued by Deputy Commissioner of Police Anand Bhoite
महत्त्वाच्या बातम्या
- STORY BEHIND SAMNA EDITORIAL : आता शिवसेनेसाठी धर्म म्हणजे अफूची गोळी ….! भगव्या वस्त्रांवरही आक्षेप…म्हणे राहुल गांधी म्हणतात तेच खरे …
- हिंदू व्होट बँकेवरून चंद्रकांत दादा – संजय राऊतांमध्ये खेचाखेची; राष्ट्रवादी – काँग्रेसची घसराघसरी!!
- ‘ही तर सरकार प्रेरित हत्या ! या खुनी सरकारवरच कलम ३०२ चा गुन्हा दाखल करावा’ ; चित्रा वाघ यांनी राज्य सरकारवर निशाना साधला
- पुणे – बंगळूर महामार्गावर कराड नजीक कोयना पुलाला पडले भगदाड; दुरुस्तीच काम वेगाने