• Download App
    पिंपरी : मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड ; राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना घडला प्रकार । Pimpri: MNS women vice president Anita Panchal's car vandalized; It happened while Raj Thackeray was on a tour of Pune

    पिंपरी : मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड ; राज ठाकरे पुणे दौऱ्यावर असताना घडला प्रकार

    ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.रस्त्याच्या कडेला त्यांनी गाडी पार्क केली होती.दरम्यान पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून फोडली. Pimpri: MNS women vice president Anita Panchal’s car vandalized; It happened while Raj Thackeray was on a tour of Pune


    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुणे दौऱ्यावर असताना पिंपरीतील मनसेच्या महिला उपाध्यक्षा अनिता पांचाळ यांच्या गाडीची तोडफोड करण्यात आली आहे.तिघा जणांनी पांचाळ यांची गाडी फोडल्याचा आरोप केला जात आहे. या प्रकरणी वाकड पोलिसात तक्रार देण्यात आली आहे.ही घटना गुरुवार,१६ डिसेंबरला पहाटेच्या सुमारास घडली.

    ही घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.रस्त्याच्या कडेला त्यांनी गाडी पार्क केली होती.दरम्यान पहाटेच्या सुमारास दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी कोयत्याने वार करून फोडली. यात, त्यांच्या गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.



    पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी भागात अनिता पांचाळ राहतात. त्या आगामी महापालिका निवडणूक लढवण्यास अनुकूल असल्याचं सांगण्यात येत आहे. अनिता पांचाळ यांनी आरोप केला आहे की,पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेच्या निवडणुका काही महिन्यांवर आल्या आहेत. याच रागातून आपल्या कारची तोडफोड करण्यात आली आहे.

    Pimpri : MNS women vice president Anita Panchal’s car vandalized; It happened while Raj Thackeray was on a tour of Pune

    महत्त्वाच्या बातम्या

     

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ