जेव्हा आग लागली ती खानावळी पासून लागली.दरम्यान आग लागल्यावर खानावळीतील कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढला.Pimpri Chinchwad: Four shops on fire in Chowk; No casualties
विशेष प्रतिनिधी
पिंपरी- चिंचवड : आज मंगळवारी (ता. ३०) सायंकाळी साडे सहाच्या सुमारास पिंपरी चिंचवड मधील वाकड चौकात असलेल्या चार दुकांनाना भिषण आग लागली.दरम्यान अग्निशामक दलाचे चार बंब घटनास्थळी दाखल झाले असून जवान आग विझविण्याचा प्रयत्न करीत आहेत.सुदैवाने या आगीत कोणालाजी इजा झाली नसली तरी चार दुकाने जळून खाक झाली आहेत.
चिंचवड मधील डांगे चौक वाकड रस्त्यावरील मन्नत हॉटेल जवळ किराणा दुकान , भाजीपाला, स्टेशनरी, गादी कारखाना व खानावळ अशी चिटकून एका रांगेत चार ते पाच दुकाने आहेत.जेव्हा आग लागली ती खानावळी पासून लागली.दरम्यान आग लागल्यावर खानावळीतील कर्मचाऱ्यांनी बाहेर पळ काढला.
कर्मचाऱ्यांनी शेजारील सर्वांना तात्काळ आगीची माहिती दिल्याने सर्वजण सुखरुप बाहेर पडू शकले.परंतु ही आग शेजारच्या बाकीच्या तीन दुकांनापर्यंत पोहचली.दरम्यान काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केल्याने चारही दुकाने जळून खाक झाली.