विशेष प्रतिनिधी
मुंबई : शिंदे – फडणवीस सरकारच्या अर्थसंकल्पात महिला, शेतकरी, विद्यार्थ्यांसाठी विविध योजना आणण्यात आल्या आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठा फायदा होणार आहे. लाडकी बहीण, विद्यार्थी शिष्यवृत्ती अशा अनेक योजनांची घोषणा काल वित्तमंत्री अजित पवार यांनी केली. या योजनांवरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये काल कलगीतुरा पहायला मिळाला. पण आज राज्यातील भक्तांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. Pilgrimage Scheme for Senior Citizens
पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील भाविकांसाठी गुड न्यूज दिली आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना इच्छा असून पैशांमुळे देवदर्शन करता येत नाही. ज्यांना परवडते, तेच फक्त सहकुटुंब देवदर्शनाला जातात. पण ज्यांना नाही परवडत त्यांची इच्छा अपूर्णच राहते. या भाविकांसाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना आम्ही लागू करणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत जाहीर केले. लवकरच ही योजना सुरु होणार असून राज्यातील भाविकांना याचा लाभ होणार आहे. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना याचा लाभ घेता येणार आहे.
याचे तिकीट दर किती असणार?? मोफत असणार की त्यात शुल्क माफी असणार?? या योजनेअंतर्गत कोणत्या देवस्थानांचा समावेश असणार?? याचे नियोजन कसे होणार? यामुळे राज्याच्या तिजोरीवर किती भार पडणार?? हे सर्व लवकरच स्पष्ट होणार आहे.
Pilgrimage Scheme for Senior Citizens
महत्वाच्या बातम्या
- शिक्षणमंत्री म्हणाले- केंद्र सरकार NEETवर चर्चेस तयार; NTA मॉनिटरिंग कमिटीने पालक-विद्यार्थ्यांच्या सूचना मागवल्या
- बंगालच्या राज्यपालांचा ममतांवर मानहानीचा खटला; मुख्यमंत्री म्हणाल्या होत्या- महिला राजभवनात जायला घाबरतात
- येडियुरप्पांविरुद्ध लैंगिक शोषणाच्या खटल्यात 750 पानांचे आरोपपत्र दाखल; 75 जण साक्षीदार
- बहीण लाडकी सरकारची; होणार मतदार कोणाची??