विशेष प्रतिनिधी
कल्याण : कल्याण डोंबिवली शहराला जोडणाऱ्या समांतर रस्त्याच्या रेल्वेकडील बाजूस असलेल्या संरक्षक भिंतीवर देशासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानी, देशाचे नाव उज्जवल करणाऱ्या खेळाडुंची चित्रे रेखाटण्यात आली आहेत. Pictures of players with freedom fighters on the wall on the road parallel to the Dombivli railway
या आकर्षक चित्रांचे अनावरण २६ जानेवारी रोजी होणार आहे. शहरातूनच नव्हे तर आजूबाजूच्या परिसरातून या चित्रांचे कौतुक आणि चर्चा होत आहे
डोंबिवली शहराच्या सुशोभीकरणात भर घालण्यासाठी जे जे स्कुल ऑफ आर्टस् मधून २०११ मध्ये उत्तीर्ण झालेल्या १० विद्यार्थ्यांनी हे सजावटीचे काम आव्हान म्हणून स्वीकारले.
भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध धर्माचे सण उत्सवाचे चित्र रेखाटण्यात आले आहे .नवीन पिढीला धार्मिक सण, उत्सव ,भारताने गाठलेल्या आचिव्हमेंट्स बद्दल,देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या स्वतंत्र्यसेनानी ची माहिती त्यांना समजावून देणे हाच उद्देश असल्याची माहिती अमोल बोचरे यांनी दिली. ठाकुर्ली म्हसोबा चौक ते पत्रिपुल पर्यतच्या भिंतीवर हे चित्रीकरण पूर्ण झाले असून २६ जानेवारीला या चित्रांचे लोकर्प केले जाणार असल्याचे या विद्यार्थ्यांनी सांगितले.
Pictures of players with freedom fighters on the wall on the road parallel to the Dombivli railway
महत्त्वाच्या बातम्या
- शासकीय वसतीगृहाचा वापर तात्पुरत्या कारागृहासाठी
- महाराष्ट्राच्या चार बालकांची ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार-२०२२’साठी निवड पंतप्रधानांनी बालकांशी संवाद साधला
- सहकार सम्राटांविरुध्द अण्णा हजारे यांचा एल्गार, सहकार साखर कारखान्यांच्या विक्रीत २५ हजार कोटींचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप, अमित शहांना लिहिले पत्र
- पेण : शिर्की चाळ नंबर 2 येथील सागरवाडीत शॉर्टसर्कीटमुळे आग , संपूर्ण घर जळून खाक