• Download App
    मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ महिला समुद्रात पडली; फोटोग्राफरने पाण्यात उडी टाकून वाचविले। Photographer Rescued a Woman Who Fell into the Sea

    मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ महिला समुद्रात पडली; फोटोग्राफरने पाण्यात उडी टाकून वाचविले

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुंबईतील गेट वे ऑफ इंडियाजवळ एक महिला समुद्रात पडली. यानंतर प्रसंगावधान राखत एका फोटोग्राफरनं तात्काळ समुद्रात उडी घेतली. त्याने तत्परता दाखवत महिलेचा जीव वाचवला आहे. त्याबाबतचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. Photographer Rescued a Woman Who Fell into the Sea

    गेट वे ऑफ इंडिया येथील सुरक्षा भितींवर बसलेल्या एका महिलेचा तोल गेला. ती समुद्रात पडली. यानंतर याठिकाणी येणाऱ्या पर्यटकांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरनं लगेचच समुद्रात उडी मारली आणि या महिलेचा जीव वाचवला. ही घटना सोमवारी घडली असून घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे.

    फोटोग्राफरच्या या धाडसाचं आणि स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यानं केलेल्या या मदतीचं सगळ्यांकडूनच कौतुक होत आहे.
    व्हिडिओमध्ये पाहायला मिळतं की या व्यक्तीनं महिलेलेला वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली आहे. पर्यटकांनी त्यांना वरती खेचण्यासाठी पाण्यात दोर टाकला. याच्याच मदतीनं महिलेला वर काढलं. महिला २० फूट खोल पाण्यात कोसळल्यानं बचावकार्यासाठी बराच वेळ लागला. मात्र, घटनेत तिचा जीव वाचला.

    • गेट वे ऑफ इंडियाजवळ महिला समुद्रात पडली
    • सुरक्षा भितींवर बसलेल्या एका महिलेचा तोल गेला
    • पर्यटकांचे फोटो काढणाऱ्या फोटोग्राफरची उडी
    • फोटोग्राफरनं या महिलेचा जीव वाचवला
    • पर्यटकांनी वरती खेचण्यासाठी पाण्यात दोर टाकला
    • दोराच्या सहाय्याने दोघांना समुद्रातून बाहेर काढले

    Photographer Rescued a Woman Who Fell into the Sea

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    आव्हाड – पडळकर यांच्या कार्यकर्त्यांच्या हाणामारीवर मुख्यमंत्री फडणवीसांचे टीकास्त्र; कठोर कारवाईचे आदेश; पडळकरांकडून दिलगिरी व्यक्त

    केंद्रात INDI आघाडीची बैठक बोलावण्याचा काँग्रेसचा संकल्प; त्या उलट महाराष्ट्रात बैल आणि तुतारी वरून काँग्रेस -‌ राष्ट्रवादीत संघर्ष!!

    Maharashtra : महाराष्ट्रातील बडे अधिकारी हनीट्रॅपच्या जाळ्यात; विधानसभेत उपस्थित झाला मुद्दा, सरकारकडे स्पष्टीकरणाची मागणी