विशेष प्रतिनिधी
सांगली : सांगली जिल्ह्यात कृष्णा नदीला आलेल्या महापुराच्या पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कृष्णाकाठच्या गावांची पाहणी केली. यावेळी त्यांनी यंत्रणा पोचली नाही तर मोबाईलवरील फोटोच पंचनामा म्हणून ग्राह्य धरावा, असे आवाहन त्यांनी केले.photo on mobile should be Considered as
Punchnama : Devendra Fadnavis
वाळवा येथील अंकलखोप येथे देवेंद्र फडणवीस यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केली. या वेळी फडणवीस म्हणाले, या पुरामुळे आणि कोरोनामुळे बारा बलुतेदार उध्वस्त होत आहेत. तसेच मागच्या वेळी सारखी मदत कशी मिळेल त्यासाठी सरकारकडे प्रयत्न करू.
तसेच सरकारने पंचनाम्याच खूळ माग लावलं आहे. पण यंत्रणा पोचली नाही तर नुसता मोबाईलवर एक फोटो काढावा आणि हा एक फोटो पंचनामा म्हणून ग्राह्य धरावा, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
- पूरग्रस्त ठिकाणी यंत्रणा पोचली नाही तर
- मोबाईलवरचा फोटोच पंचनामा म्हणून ग्राह्य धरा
- माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
- अंकलखोप येथे फडणवीस, दरेकर यांचा दौरा
- पूरग्रस्त भागाची पाहणी आणि ग्रामस्थांशी चर्चा
- मागच्या वेळी सारखी मदत देण्याचे आश्वासन
- सरकारने पंचनाम्याच खूळ माग लावल्याचा आरोप