• Download App
    Photo of Tipu Sultan in Malegaon Deputy Mayor's office; Former MLA's daughter continues anti-Hindu "tradition"!!

    मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो; माजी आमदारांच्या मुलीने चालवली हिंदू विरोधी “परंपरा”!!

    Tipu Sultan

    विशेष प्रतिनिधी

    नाशिक :मालेगावच्या उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावून माजी आमदारांच्या मुलीने चालवली हिंदू विरोधी “परंपरा”!!, हेच राजकीय वास्तव महापालिकांच्या निवडणुकीनंतर समोर आले.

    मालेगावात इस्लाम पार्टी समाजवादी पार्टी यांची युती सत्तेवर आली. या सत्तेतला उपमहापौर पदाचा वाटा समाजवादी पार्टीला मिळाला. समाजवादी पार्टीच्या नेत्या शान ए‌ हिंद उपमहापौर बनल्या. उपमहापौर बनताच त्यांनी आपला हिंदू विरोधी चेहरा सगळ्या जनतेसमोर आणला. त्यांनी उपमहापौरांच्या कार्यालयात टिपू सुलतानचा फोटो लावला. त्यामुळे मालेगावातल्या शिवसैनिकांनी त्यांना तीव्र विरोध केला. पण शान ए हिंद आपल्या हिंदू विरोधी निर्णयापासून मागे हटल्या नाहीत.



    हिंदू विरोधाची परंपरा त्यांच्या घरात त्यांच्या वडिलांपासूनच आहे कारण त्यांचे वडील निहाल अहमद एकेकाळी जनता दलाचे महाराष्ट्रातले मोठे नेते होते. आमदार होते. मालेगाव महापालिकेचे ते पहिले महापौर होते. हे तेच निहाल अहमद होते, ज्यांनी एकेकाळी मालेगावात सार्वजनिक गणपतीच्या आराशीला लाथ मारली होती. पण त्यानंतर मात्र त्यांची राजकीय घसरण देखील झाली होती. एकेकाळी निहाल अहमद यांच्यामुळे मालेगाव हे शहर महाराष्ट्रात चर्चेमध्ये होते. ते जनता पक्ष आणि जनता दलाचे आमदार होते. काही काळ जनता दलाचे प्रदेशाध्यक्ष सुद्धा होते. आज त्यांच्याच मुलीने टिपू सुलतानचा फोटो आपल्या कार्यालयात लावून आपल्या वडिलांची हिंदू विरोधी परंपरा पुढे चालविली.

    Photo of Tipu Sultan in Malegaon Deputy Mayor’s office; Former MLA’s daughter continues anti-Hindu “tradition”!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadnavis : अजितदादांचा घातपात असेल तर आकाशपाताळ एक करू; कोणाच्या बापालाही सोडणार नाही, CM देवेंद्र फडणवीसांचा निर्धार

    Narhari Zirwal : मंत्री नरहरी झिरवाळ शासकीय निवासस्थानात ट्रान्सजेंडर व्यक्तीसोबत कॅमेऱ्यात कैद, काँग्रेसकडून हकालपट्टीची मागणी

    Sunil Tatkare : मर्यादा ओलांडू नका, अन्यथा मला तोंड उघडावे लागेल, सुनील तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा