प्रतिनिधी
पुणे : भारतभरात दहशतवादी कृत्यांना आर्थिक पाठिंबा देऊन टेरर फंडिंग करणाऱ्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया अर्थात PFI या संघटनेवर NIA आणि ED ने छापे घालून 106 म्होरक्यांना अटक केली. त्यानंतर अनेक राज्यांमध्ये PFI समर्थकांनी हिंसक आंदोलने केली. या आंदोलनांमध्येच आता पुण्यात पीएफआयच्या समर्थकांनी पाकिस्तान झिंदाबाद आणि नारा- ए- तकबीर, अल्लाह हू अकबरची घोषणाबाजी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. PFI supporters raise Pakistan Zindabad slogans in front of Collectorate in Pune
शुक्रवारी सायंकाळी पुण्यातील मुस्लिम समुदायामधील काही व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ही घोषणाबाजी केली. PFI वर घातलेल्या छाप्यांचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचे नियोजन या आंदोलकांनी केले होते. मात्र, हे आंदोलन सुरु होण्याच्या आधीच पुणे पोलिसांनी अनेक आंदोलकांना ताब्यात घेतले.
पीएफआय समर्थकांविरोधात गुन्हा दाखल
यानंतर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी पाकिस्तान जिंदाबाद आणि नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर च्या घोषणा दिल्या. या घोषणाबाजीचा धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यावेळी आंदोलकांनी आरएसएस मुर्दाबाद अशीही घोषणाबाजी केली. या घोषणाबाजी प्रकरणामध्ये पुणे पोलिसांनी रियाज सय्यद आणि 60 ते 70 पीएफआय कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेकायदेशीररित्या जमाव जमावल्याचा उल्लेख पोलिसांनी गुन्ह्याच्या नोंदीत केला आहे.
PFI supporters raise Pakistan Zindabad slogans in front of Collectorate in Pune
महत्वाच्या बातम्या
- India Forex Reserve : परकीय चलनसाठा 5.22 अब्जांच्या घसरणीसह दोन वर्षांच्या नीचांकी पातळीवर
- New Telecom Bill : व्हॉट्सअॅप कॉलसाठीही द्यावे लागणार पैसे, सरकारने मागितल्या लोकांकडून सूचना, जाणून घ्या काय आहे नवीन दूरसंचार विधेयकात?
- दसरा मेळावा : शिवसेनेचे दोन गटांमध्ये झुंज; मित्र पक्षांच्या गोटात ताकदीच्या घटी-वाढीचा आनंद!!
- ठाकरे गटाचा दसरा मेळावा शिवतीर्थावर!; पहिली फेरी जिंकली, पण पुढे काय?