• Download App
    पेट्रोल - डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांमध्ये असे असतील नवे दर!!Petrol-Diesel cheaper, new rates in major cities from Friday!!

    पेट्रोल – डिझेल स्वस्त, शुक्रवारपासून प्रमुख शहरांमध्ये असे असतील नवे दर!!

    प्रतिनिधी

    मुंबई : महाराष्ट्रात नव्याने स्थापन झालेल्या शिंदे – फडणवीस सरकारने राज्यातील जनतेला मोठे गिफ्ट दिले आहे. गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोल – डिझेलवर करकपात केली आहे. या निर्णयामुळे राज्यात पेट्रोल-डिझेल स्वस्त होऊन जनतेला मोठा दिलासा मिळणार आहे. गुरुवारी रात्री 12 पासून हा निर्णय संपूर्ण राज्यात लागू होणार आहे. त्यामुळे शुक्रवारपासून राज्यातील विविध भागांत पेट्रोल-डिझेलचे दर कमी होणार आहेत. Petrol-Diesel cheaper, new rates in major cities from Friday!!

    – प्रमुख शहरांत असे असतील नवीन दर

    मुंबई

    पेट्रोल : जुने दर- 111.35 रु./लिटर, नवे दर- 106.35 रु./लिटर

    डिझेल : जुने दर- 97.28 रु./लिटर, नवे दर- 94.28 रु./लिटर

    पुणे

    पेट्रोल : जुने दर- 110.88 रु./लिटर, नवे दर- 105.88 रु./लिटर

    डिझेल : जुने दर- 95.37 रु./लिटर, नवे दर- 92.37 रु./लिटर

    ठाणे

    पेट्रोल : जुने दर- 111.49 रु./लिटर, नवे दर- 106.49 रु./लिटर

    डिझेल : जुने दर- 97.42 रु./लिटर, नवे दर- 94.42 रु./लिटर

    नागपूर

    पेट्रोल : जुने दर- 97.04 रु./लिटर, नवे दर- 92.04 रु./लिटर

    डिझेल : जुने दर- 89.89 रु./लिटर, नवे दर- 86.89 रु./लिटर

    नाशिक

    पेट्रोल : जुने दर- 111.74 रु./लिटर, नवे दर- 106.74 रु./लिटर

    डिझेल : जुने दर- 96.20 रु./लिटर, नवे दर- 93.20 रु./लिटर

    औरंगाबाद

    पेट्रोल : जुने दर- 112.97 रु./लिटर, नवे दर- 107.97 रु./लिटर

    डिझेल : जुने दर- 98.89 रु./लिटर, नवे दर- 95.89 रु./लिटर

    Petrol-Diesel cheaper, new rates in major cities from Friday!!

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : भाडेतत्त्वावर परवडणाऱ्या घरांसाठी सक्षम यंत्रणा कार्यान्वित करा, देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

    नागपूरच्या ईश्वरी पांडेने पार केली पाल्कची समुद्रधुनी; जिद्द, धैर्य आणि अदम्य इच्छाशक्तीचे प्रेरणादायी उदाहरण!!; मुख्यमंत्र्यांकडून कौतुक

    Baramati Bypoll 2026 : बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसची माघार; हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती; तरीही निवडणूक बिनविरोध नाहीच, 23 उमेदवार रिंगणात