प्रतिनिधी
मुंबई : केंद्र सरकारने आधीच पेट्रोल डिझेलच्या उत्पादन शुल्कात कमी करून नागरिकांना दिलेला दिलासा महाराष्ट्रात शिंदे फडणवीस सरकारने आणखीन वाढवून दिला आहे महाराष्ट्रात पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल तीन रुपयांनी स्वस्त करण्याचा निर्णय शिंदे फडणवीस सरकारने आज घेतला आहे त्याचबरोबर देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळातले सगळे महत्त्वाचे निर्णय परत जसेच्या तसे लागू करण्याचा अटी महत्त्वाचा निर्णय देखील शिंदे फडणवीस सरकारने घेतला आहे. यामुळे ठाकरे पवार सरकारचे गेले अडीच वर्षातले सगळे निर्णय एक प्रकारे रद्दबातल ठरले आहेत. Petrol 5 – Diesel cheaper by Rs 3; All the previous decisions of the Fadnavis government came back
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आज कॅबिनेटच्या बैठकीत काही लोकहिताचे महत्वाचे निर्णय घेतले. यामध्ये पेट्रोल डिझेलचे दर कमी करण्याचा मोठा निर्णय घेतला. त्यानुसार आज मध्यरात्रीपासून पेट्रोल पाच रुपयांनी आणि डिझेल तीन रुपयांनी स्वस्त होईल. यामुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर 6000 कोटींचा भार पडणार आहे. पेट्रोल – डिझेलचे दर कमी केल्याने राज्यातील मालवाहतूकीचा खर्च कमी होऊन महागाई काही प्रमाणात कमी होणार आहे.
याखेरीज 2019 पूर्वीच्या फडणवीस सरकारने घेतलेले सगळे निर्णय शिंदे फडणवीस सरकारने पुन्हा लागू केले आहेत.
यामध्ये राज्यातील सर्व ग्रामपंचायतच्या सरपंचांची निवड थेट लोकांमधून होईल. नगराध्यक्षांची निवडणूक तशीच होईल.
त्याचबरोबर सर्व बाजार समित्यांमध्ये शेतकऱ्यांना थेट मतदान करण्याचा अधिकार पुन्हा प्राप्त होईल.
याखेरीज मुख्यमंत्र्यांनी मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन संदर्भात सर्व क्लिअरन्स कालच दिले आहेत.
केंद्र सरकारची अमृत योजना महाराष्ट्रातील ४०० गावे आणि शहरांना लागू करण्याची घोषणा देखील शिंदे फडणवीस यांनी केली आहे.