• Download App
    पंढरी टाळ-मृदंग, हरिनामाच्या जयघोषाने पुन्हा दुमदुमणार; कोरोनाचे नियम पाळून कार्तिकी यात्रेला परवानगी । Permission with covid 19 norms for pandharpur kartik yatra 2021

    पंढरी टाळ-मृदंग, हरिनामाच्या जयघोषाने पुन्हा दुमदुमणार; कोरोनाचे नियम पाळून कार्तिकी यात्रेला परवानगी

    वृत्तसंस्था

    पंढरपूर : राज्यात प्रथमच पंढरपूरची कार्तिकी यात्रा भरणार आहे. मात्र त्यासाठी कोरोनाचे सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे, अशी माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली आहे. Permission with covid 19 norms for pandharpur kartik yatra 2021

    कार्तिकी यात्रा भरविण्यासाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सकारात्मकता दाखवली होती. त्यानंतर आता सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांनी कार्तिकी यात्रा होणार असल्याचे स्वतंत्र आदेश दिले. त्यामुळे दीड वर्षांनंतर पंढरीत टाळ-मृदंग आणि हरिनामाच्या जयघोषाने नगरी पुन्हा दुमदुमून निघणार आहे. दरम्यान, कार्तिकी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने निमंत्रण दिले आहे.



    कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या सर्व दिंडय़ांच्या वास्तव्याची व्यवस्था चंद्रभागा नदीच्या ६५ एकर परिसरात करण्यात येणार आहे. वाळवंटात भजन, कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रमांना परवानगी आहे. तसेच कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सपत्नीक होणार आहे. या प्रसंगी मानाचे वारकरीदेखील उपस्थित राहतील. श्री विठ्ठल, रखुमाई यांच्या पदस्पर्श दर्शन रांगेसाठी व्यवस्था आहे. कार्तिकी यात्रेसाठी पंढरीत येणाऱ्या भाविकांनी आरोग्यविषयक काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा, असे आवाहन प्रांताधिकारी तथा मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी केले आहे.

    Permission with covid 19 norms for pandharpur kartik yatra 2021

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस