विशेष प्रतिनिधी
नागपूर : नागपूर येथील विधानसभेच्या समिती सभागृह येथे आज परिवहन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते “झेब्रू” या रस्ता सुरक्षा जनजागृती शुभंकरचे आज अनावरण करण्यात आले.
आपल्या देशात रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. हे चित्र बदलण्यासाठी रस्ता ओलांडताना झेब्रा क्रॉसिंगचा वापर करणे गरजेचे आहे. त्यासाठीच “झेब्रू” ही संकल्पना राबवण्यात येणार आहे.
रस्त्यावर चालताना ‘पहिला हक्क पादचाऱ्यांचा’ हा संदेश झेब्रुच्या माध्यमातून प्रभावीपणे दिला जाणार आहे. “झेब्रू” रस्त्यावर चालताना पादचाऱ्यांना प्राधान्य देण्याची जाणीव वाहनचालकांमध्ये निर्माण करेल. या उपक्रमामुळे रस्ता सुरक्षेचे महत्त्व लोकांच्या मनावर बिंबवले जाईल. विशेषतः लहान मुले, विद्यार्थी आणि युवकांमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती निर्माण करणे हे याद्वारे साध्य करण्याचा प्रयत्न परिवहन विभाग करेल.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार आणि परिवहन विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
Pedestrians have the first right to walk on the road.
महत्वाच्या बातम्या
- ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे निधन
- वंदे मातरम वरील चर्चेत नेहरूंवर आघात आणि संघावर प्रतिघात!!
- राज्याची आर्थिक परिस्थिती ओढाताणीची पण राज्य कुठेही दिवाळखोरीकडे नाही, मुख्यमंत्र्यांनी केले स्पष्ट
- निलंबित टीएमसी आमदार हमायून कबीर एआयएमआयएम सोबत आघाडीची घोषणा; बंगाल निवडणुकीत ‘गेम-चेंजर’ ठरणार असल्याचा दावा