• Download App
    पुणे - मुंबई प्रवासादरम्यान पवारांचे प्रतिभाताईंसह "राज ठाकरे स्टाईल" स्वागत!!|Pawar's "Raj Thackeray style" reception with talent during Pune-Mumbai journey!!

    पुणे – मुंबई प्रवासादरम्यान पवारांचे प्रतिभाताईंसह “राज ठाकरे स्टाईल” स्वागत!!

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी प्रतिभाताईंसह आज पुण्याहून मुंबईला येण्यासाठी जो प्रवास केला. त्यावेळी शरद पवारांचे त्यांच्या समर्थकांनी ठिकठिकाणी राज ठाकरे स्टाईल स्वागत केले.Pawar’s “Raj Thackeray style” reception with talent during Pune-Mumbai journey!!

    राज ठाकरे जसे दौऱ्यावर निघताना वेगवेगळ्या गावांमध्ये कार्यकर्ते रस्त्यांवर उभे राहून त्यांच्यावर पुष्पवृष्टी करतात, त्यांना हार घालतात. त्याच स्टाईलने शरद पवारांना आज पुणे – मुंबई प्रवासादरम्यान स्वागताचा अनुभव आला. पवारांच्या गाड्यांचा ताफा कार्यकर्त्यांनी अनेक ठिकाणी थांबवून त्यांचे राज ठाकरे स्टाईलने स्वागत केले. त्यामुळे प्रतिभाताई देखील भारावून गेल्या.



    अजित पवारांनी यशवंत मार्ग अवलंबत ते सत्तेसाठी भाजप बरोबर निघून गेले. त्याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली. या पार्श्वभूमीवर आपण नवा पक्ष उभा करू, असे सांगत शरद पवारांनी कालपासूनच कराड पासून दौरा सुरू केला. काल त्यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे प्रीतीसंगमावर जाऊन दर्शन घेतले. आज ते पुण्याहून मुंबईला गेले. त्यावेळी वेगवेगळ्या शहरांच्या नाक्या नाक्यांवर पवार समर्थक उभे होते. त्यांनी पवारांच्या गाड्यांचा ताफा दिसताच, त्यावर पुष्पवृष्टी केली. पवारांचे ठिकठिकाणी असे स्वागत झालेले पाहून प्रतिभाताई भारावून गेल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत.

    Pawar’s “Raj Thackeray style” reception with talent during Pune-Mumbai journey!!

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    साहेब खडे तो सरकार से बडे; पण सगळी राजकीय स्वप्नं धुळीस मिळे!!

    Gajanan Bhaskar Mehendale : इतिहासाचे एक महत्त्वाचे पान काळाच्या पडद्याआड पालटले ! मान्यवरांच्या उपस्थितीत महिंदळे यांना अंतिम निरोप

    Gopichand Padalkar : वादग्रस्त वक्तव्यांची पडळकरांची मालिका सुरूच !