विशेष प्रतिनिधी
मुंबई : लोकसभा निवडणुकीचे मतदान उद्यावर येऊन ठेपले असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहून दुष्काळाच्या मुद्द्यावर संघर्षाची भूमिका घेण्याचा इशारा दिला, तर दुपारी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीने राजकीय तडजोडी करण्याच्या बैठका घेतल्या. Pawar’s posture of struggle in the morning
महाराष्ट्रातील दुष्काळा संदर्भात शरद पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले. महाराष्ट्रातल्या दुष्काळाचे सविस्तर वर्णन त्यामध्ये केले. त्याचवेळी दुष्काळासारख्या प्रश्नावर आपण समन्वयाने काम करण्याची तयारी दाखवली. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात बैठकही घेतली. त्या बैठकीला काही नेते गैरहजर होते याची दखल आपण घेतली असेल. परंतु, त्यानंतर कुठली पावले उचलले गेल्याचे दिसले नाही. इथून पुढे दुष्काळ निवारणासाठी लक्षणीय पावले उचलली गेली नाहीत, तर संघर्षाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशारा शरद पवारांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना दिला.
दुपारी शरद पवारांनी यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच्या तयारी संदर्भात बैठका घेतल्या. त्याच दरम्यान पवारांना मराठवाड्यातल्या उदगीर मतदार संघाचे भाजपचे माजी आमदार सुधाकर भालेराव येऊन भेटून गेले. उदगीर मतदार संघात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे संजय बनसोडे आमदार आहेत महायुती मधून विद्यमान आमदारांना तिकीट द्यायचे निश्चित झाले, तर संजय बनसोडेंचा नंबर लागेल हे लक्षात घेऊन सुधाकर भालेराव यांनी शरद पवारांची भेट घेतल्याचे मानण्यात येते. मात्र पवार आणि भालेराव यांच्यातील चर्चेचा तपशील समोर आला नाही.
शरद पवारांनी सकाळी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दुष्काळाच्या प्रश्नावर संघर्षाची भूमिका घेण्याचा इशारा दिला, तर दुपारी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकांच्या दृष्टीने अशा तडजोडीच्या बैठका घेतल्या.
Pawar’s posture of struggle in the morning
महत्वाच्या बातम्या
- अंतरवलीतले सलोख्याचे वातावरण बिघडले, मनोज जरांगेंना उपोषणाची परवानगी नको; ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र!!
- निवडणूक आयोगाने सांगितला आकडा 64.20 लाख; भारतीय मतदारांनी घातला जागतिक विक्रमाला हात!!
- केजरीवालांचे तिहार जेलमध्ये आत्मसमर्पण; 5 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडी; म्हणाले- तुरुंगातून कधी परत येईन माहीत नाही
- निवडणूक आयोगाच्या गाठीभेटी, मागण्यांची सादर केली यादी, प्रत्यक्षात निकालच नाकारायची काँग्रेसची तयारी; भाजपचीही कुरघोडी!!