विशेष प्रतिनिधी
नंदुरबार : बारामती लोकसभा मतदारसंघातले मतदान पार पडताच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात विलीन करण्याचे संकेत दिले. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार मध्ये त्यापुढे जाऊन मोठा गौप्यस्फोट केला.Pawar’s party merges with Congress after Lok Sabha elections; Fadnavis’ secret blast from Nandurbar!!
शरद पवारांना आता त्यांचा पक्ष जड झाला आहे. तो चालविणे शक्य नसल्याचे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर ते आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, अशा स्पष्ट शब्दांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी नंदुरबार मध्ये राजकीय भाकीत वर्तविले.
शरद पवारांनी त्यांच्या राजकीय आयुष्यात आत्तापर्यंत अनेकदा नवे पक्ष तयार केले. ते परत काँग्रेसमध्ये विलीन केले. त्यामुळे 2024 च्या लोकसभा निवडणुकीनंतरही ते आपला पक्ष काँग्रेसमध्येच विलीन करतील, अशी स्पष्टोक्ती फडणवीस यांनी केली.
काँग्रेसमधून नुकतेच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत दाखल झालेले हिंदी सामनाचे माजी संपादक संजय निरुपम यांनी देखील आपल्या सोशल मीडिया हँडलवरून हाच निष्कर्ष काढला. शरद पवारांनी आतापर्यंत अनेकदा आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचे प्रस्ताव दिले होते. परंतु, त्यांनी सुप्रिया सुळे यांचे नेतृत्व काँग्रेसने मान्य करावे, अशी अट घातली होती. ती अट काँग्रेसला मान्य नव्हती. त्यामुळे विलीनीकरण टळत होते. परंतु, आता परिस्थिती एवढी बदलली आहे की, शरद पवारांना त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याखेरीज दुसरा पर्याय उरलेला नाही. पण शरद पवारांनी आपल्या पक्षाचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण म्हणजे दोन बुडीत निघालेल्या कंपन्यांचे विलीनीकरण ठरेल आणि त्याचा निष्कर्ष एक मोठा 0 असाच येईल, असे संजय निरुपम यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर लिहिले आहे.
Pawar’s party merges with Congress after Lok Sabha elections; Fadnavis’ secret blast from Nandurbar!!
महत्वाच्या बातम्या
- देवेंद फडणवीस म्हणाले- ज्यांचा एका नेतृत्वावर विश्वास नाही त्यांच्या मागे देश जाणार नाही; इंडिया आघाडीचे सरकार येणे अशक्यच!
- झारखंड: EDने मंत्री आलमगीर आलम यांचे पीएस संजीव लाल अन् त्यांच्या सहाय्यकास केली अटक
- पंतप्रधान मोदींनी अहमदाबादला जाऊन मतदानाचा हक्क बजावला!
- सहानुभूतीच्या भांडवलाची विरुद्ध बड्या नेत्यांच्या भाषणाची + क्लस्टर सिस्टीमने केलेल्या कामाची आज परीक्षा!!