विशेष प्रतिनिधी
मुंबई : पवारांच्या कुटुंबात काय चालले आहे, कोण एकत्र येत आहेत, कोण वेगवेगळ्या पाटावर बसत आहेत, हा त्यांचा प्रश्न. त्यांचे कुटुंब त्यांची जबाबदारी. पण लोकांच्या मनात अजिबात संभ्रम नाही. लोकांना ढोंगी आणि डरपोक गवत कायमचे उपटून टाकायचे आहे. महाराष्ट्र “धर्म” हा मर्दांचा आणि स्वाभिमान्यांचा आहे. मंबाजी आणि तुंबाजीसारख्यांचा तो नाही, अशा परखड शब्दांमध्ये सामनाच्या अग्रलेखातून पवार काका पुतण्यांची आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची धुलाई केली आहे.Pawar’s family their responsibility in saamana
त्याच वेळी एक वेळ मोदी जिंकतील पण त्यांचा पक्ष पराभूत होईल, अशी कबुली आणि मखलाशीही याच अग्रलेखातून सामनाने केली आहे.
एबीपी माझा आणि सी वोटरने घेतलेल्या सर्वे मधून महाराष्ट्रात ठाकरे – पवार आणि काँग्रेस महाआघाडीला लोकसभेच्या 26 जागा मिळतील, असे भाकीत वर्तविले आहे त्यामुळे ठाकरेंच्या दंडात बेटकुळ्या आल्या आणि त्या बेटकुळ्यांच्या बळातूनच सामनाच्या अग्रलेखातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची धुलाई आणि शरद पवारांवर टोलेबाजी करण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी जिंकले तरी तो त्यांचा स्वतःचा विजय असेल, तो त्यांच्या पक्षाचाही विजय नसेल आणि त्या विजयात एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांचा तर बिलकुल वाटा नसेल. उलट त्यांनी आपापल्या बिदागीत मिळालेल्या चिन्हांवर म्हणजे धनुष्यबाण आणि घड्याळावर लढायचे की नाही, हे भाजप श्रेष्ठी म्हणजेच अमित शाह हेच ठरवणार आहेत. त्यामुळे अजित पवारांनी कितीही वल्गना केल्या तरी त्याला अर्थ नाही, अशी टीकाही या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची “मंबाजी” आणि अजित पवारांची “तुंबाजी” अशा शब्दांमध्ये संभावना करण्यात आली आहे. त्याचवेळी प्रफुल्ल पटेल यांची “मिरची छाप” म्हणून वासलात लावण्यात आली आहे.
Pawar’s family their responsibility in saamana
महत्वाच्या बातम्या
- 24 जानेवारीला तज्ज्ञ वकिलांची फौज कोर्टात बाजू मांडणार, मराठा समाजाला न्याय मिळेल, मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही
- DMK नेत्याची हिंदी भाषकांविरुद्ध गरळ; उत्तर प्रदेश, बिहार मधले लोक तामिळनाडूत येऊन टॉयलेट साफ करतात!!
- सगळेच प्रभारी बदलून काँग्रेसने टाकली “कात” की प्रियांकांना करून दिला “एस्केप रूट”??
- अखनूरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न फसला; जवानांनी एका घुसखोर दहशतवाद्याला केलं ठारं, तिघांनी काढला पळ