प्रतिनिधी
बारामती : नगर, कोल्हापूर मधल्या घटनांवरून आधी महाराष्ट्रातल्या शिंदे – फडणवीस सरकार वरच दंगल घडवण्यासाठी फूस लावण्याचा ठपका ठेवणाऱ्या शरद पवारांचा सूर बारामतीत गेल्यावर बदलला आहे. आता त्यांनी महाराष्ट्रात शांतता राखण्यासाठी शासकीय यंत्रणांना सहकार्य करण्याचे आवाहन जनतेला केले आहे. बारामती पत्रकार परिषदेत ते बोलत होते.Pawar’s changed tone; First blaming the riots on the government, now appealing to the people to cooperate with the government agencies
महाराष्ट्रात दंगली घडवण्याची षडयंत्र सरकारमधलेच कोणीतरी करीत असल्याचा आरोप पवारांनी आधी केला होता. त्याचबरोबर देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन यांच्याविषयी चिंता वाटण्यासारखी परिस्थिती आहे. त्यांना संरक्षण दिले पाहिजे, असे वक्तव्य पवारांनी केले होते.
इतकेच नाही तर मी छत्रपती संभाजी नगर म्हणणार नाही,म. औरंगाबादच म्हणेन, अशा वक्तव्याची जोडही त्यांनी छत्रपती संभाजीनगर मध्ये दिली होती. पण बारामतीत आल्यावर मात्र पवारांचा सूर बदलला असून कोल्हापूर आणि नगर मध्ये घडलेल्या धार्मिक तणावाच्या घटना महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत त्यामुळे जनतेने कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी शांतता राखण्यासाठी शासकीय यंत्रणांना सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
शरद पवार म्हणाले :
कोल्हापूर, अहमदनगरमध्ये धार्मिक तणावाच्या ज्या घटना घडल्या, त्या महाराष्ट्राच्या लौकिकाला शोभणाऱ्या नाहीत. अशा स्थितीत शासकीय यंत्रणेला सर्वसामान्यांनी मनापासून सहकार्य करावे. त्यामुळे तणावपूर्ण स्थिती निवळेल आणि शांतता प्रस्थापित होईल.
राज्यात जिथे तणावपूर्ण घटना घडल्या तेथील जनतेला माझे कळकळीचे आवाहन आहे की, शांतता प्रस्थापित करण्यासाठी त्यांनी शासकीय यंत्रणेला मनापासून सहकार्य करावे. महाराष्ट्र हे संयमी आणि शांतताप्रिय राज्य आहे. महाराष्ट्रातील सर्वसामान्य लोकांची कायदा हातात घेण्याची प्रवृत्ती नाही. सर्वांनी सहकार्य केले तर आता जी काही तणावपूर्ण स्थिती आहे ती लगेच निवळेल.
राज्यात कुणी तरी जाणीवपूर्वक वाद वाढवण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांनाही माझी विनंती आहे की, अशा घटनांमध्ये सर्वसामान्यांना किंमत मोजावी लागते. अशा घटना सर्वसामान्यांच्या हिताच्या नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांची काळजी म्हणून तरी अशा घटनांना प्रोत्साहन देऊ नये.
कोल्हापूर शहराला सामाजिक परिवर्तनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. अशी पार्श्वभूमी असलेल्या शहरात तणाव निर्माण होणे चुकीचे आहे. कुणी चुकीचे वागत असेल, तर बहुसंख्य समाजाने संयमाची भूमिका घ्यावी. त्यामुळे वातावरण बदलेल.
Pawar’s changed tone; First blaming the riots on the government, now appealing to the people to cooperate with the government agencies
महत्वाच्या बातम्या
- राहुल गांधींच्या वायनाड लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार? निवडणूक आयोगाने हे दिले संकेत
- काँग्रेसच्या व्यापक मुस्लिम संपर्काची धास्ती म्हणून पवारांची भूमिका मुस्लिम धार्जिणी जास्ती!!
- ‘’… यामुळे महाराष्ट्राची मान शरमेने झुकली आहे’’ अमित ठाकरेंनी व्यक्त केला संताप!
- याला म्हणतात काँग्रेस : कर्नाटकात मोफत विजेच्या पोकळ घोषणा; प्रत्यक्षात वीज ग्राहकांवर दरवाढीचा बोजा!!