प्रतिनिधी
मुंबई : बारसू रिफायनरी प्रकल्पाला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांनी काही अटींसह पाठिंबा दिला असल्याच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांनी पुन्हा बारसू विषयात “लक्ष” घातले आहे. रिफायनी रिफायनरी प्रकल्पाच्या विरोधात आंदोलनाचे नेतृत्व करणारे सत्यजित चव्हाण यांनी आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मध्यस्थीने शरद पवारांची मुंबईतल्या यशवंतराव चव्हाण सेंटर मध्ये भेट घेतली आहे. Pawar’s “attention” again in Barsu; Satyajit Chavan met Sharad Pawar through the mediation of Jitendra Awad
बारसूतील प्रकल्पाबाबत शिवसेनेच्या ठाकरे गटाने जशी ठाम विरोधी भूमिका घेतली आहे, तेवढी ठाम विरोधी भूमिका अद्याप राष्ट्रवादी काँग्रेसने घेतलेली नाही. पण मध्यंतरी उद्योग मंत्री उदय सामंत यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीची भूमिका बारसू प्रकल्पाला अनुकूल झाली होती. अजितदादांनी तशा आशयाचे वक्तव्य देखील केले होते.
मात्र आज काही वेळापूर्वीच शरद पवारांनी बारसू प्रकल्पाच्या विषयात मध्ये पुन्हा “लक्ष” घालून सत्यजित चव्हाण या आंदोलनकर्त्यांच्या नेत्याला भेट दिली आहे. या भेटीतून आमदार जितेंद्र आव्हाड आणि आंदोलनकर्ते नेते सत्यजित चव्हाण यांना नेमके काय साध्य काय साध्य करायचे आहे?? आणि शरद पवारांना या भेटीतून वेगळे काय साध्य करवून घ्यायचे आहे??, हे पाहणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
Pawar’s attention again in Barsu; Satyajit Chavan met Sharad Pawar through the mediation of Jitendra Awad
महत्वाच्या बातम्या
- Watch : PM मोदींच्या ‘मन की बात’च्या 100 व्या भागाची कशी झाली तयारी? पाहा पडद्यामागील काही अद्भुत क्षण…
- ‘Mann Ki Baat @ 100’ : बिल गेट्स यांनी “मन की बात”च्या शतकाबद्दल पंतप्रधान मोदींना दिल्या शुभेच्छा, म्हणाले…
- मन की बात @100 : मुंबईत भाजपचे 5000 ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन
- भाजपचे टॉप बॉसेस कर्नाटकच्या रणमैदानात व्यग्र; विरोधकांचे बॉसेस कुस्तीगीर आंदोलनाला चिथावणी देण्यात व्यस्त!!