• Download App
    Pune municipal corporation प्रशांत जगताप यांचं पवारांनी ऐकलं??; पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीशी आघाडी नाही??

    प्रशांत जगताप यांचं पवारांनी ऐकलं??; पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीशी आघाडी नाही??

    नाशिक : पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचं म्हणणं पवारांनी ऐकलं??; पुण्यात अजितदादांच्या राष्ट्रवादीशी आघाडी नाही??, असा सवाल विचारायची वेळ प्रशांत जगताप यांच्याच आजच्या वक्तव्याने आली.

    प्रशांत जगताप यांनी वेळ ठरवून शरद पवारांची आज पुण्यात भेट घेतली. त्यांच्याशी पुणे महापालिका निवडणुकी संदर्भात चर्चा केली. पुण्यामध्ये दोन राष्ट्रवादींनी आघाडी केली किंवा पुण्यात शरद पवारांची राष्ट्रवादी महाविकास आघाडी मधून लढली, तर नेमका काय फरक पडेल हे प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांना समजावून सांगितले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आपली आघाडी करणे योग्य नसल्याचे मत व्यक्त केले. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्यापेक्षा आपण महाविकास आघाडी म्हणूनच पुण्यात लढले पाहिजे तर पुण्यात परिवर्तन घडू शकेल, असे प्रशांत जगताप यांनी शरद पवारांना सांगितले.

    शरद पवार यांनी प्रशांत जगताप यांचे सगळे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर पवारांनी पुण्यात दोन राष्ट्रवादींची आघाडी नको. त्याऐवजी महाविकास आघाडी म्हणूनच आपण निवडणूक लढवू, असे प्रशांत जगताप यांना सांगितले.

    ही सगळी माहिती प्रशांत जगताप यांनी शरद पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांना सांगितली. त्यामुळे पुण्यात दोन राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही अशी बातमी मराठी माध्यमांनी दिली. पण या सगळ्यांमध्ये खुद्द शरद पवारांनी पत्रकारांना काहीही माहिती दिली नाही किंवा त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वरूनही काही सांगितले नाही.



    त्यामुळेच प्रशांत जगताप यांचे शरद पवारांनी ऐकले आणि पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही असे मान्य केले का??, असे सवाल तयार झाले. या सवालांची उत्तरे खुद्द पवारांनी दिल्याशिवाय पुणे महापालिकेसाठी दोन राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणार नाही याची खात्री कुणाला पटणार??, हा खरा सवाल आहे.

    – प्रशांत जगतापांची गोची

    पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी नको, असे मत प्रशांत जगताप यांनी फक्त शरद पवारांशी बोलतानाच मांडले असे नाही तर यापूर्वी सुद्धा त्यांनी असेच मत व्यक्त केले होते. त्यासाठी त्यांची स्थानिक राजकारणातली अडचण समोर आली होती. प्रशांत जगताप हे हडपसर मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर विधानसभेची निवडणूक लढले होते परंतु चेतन तुपे यांनी त्यांना फक्त 7000 मतांनी हरविले होते. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्यातल्या स्थानिक राजकारणात चेतन तुपे, बापू पठारे, सुनील टिंगरे यांची तोंडे एकीकडे, तर प्रशांत जगताप यांचे तोंड दुसरीकडे अशी अवस्था असल्याने प्रशांत जगताप यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याला विरोध आहे. तो त्यांनी शरद पवार यांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न केला. पण म्हणून शरद पवार एकट्या प्रशांत जगताप यांचे ऐकतील आणि आपल्या पुतण्याशी पुणे महापालिका निवडणुकीत उभा दावा मांडतील, याची सुतराम शक्यता नाही.

    Pawar uncle – nephew will not come together for Pune municipal corporation election??

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    CM Fadnavis : आगामी वर्षात उद्योगांना 3% स्वस्त वीज देणार; मुख्यमंत्र्यांची ग्वाही, एक महिन्यात 45,911 सौर कृषिपंप बसवले, गिनीज बुकमध्ये नोंद

    Ravindra Chavan : भाजप प्रदेशाध्यक्षांचा शिंदे गटासोबतच्या वादावर पडदा; म्हणाले – निवडणुकीनंतर सर्वकाही विसरायचे असते; सरकारचा लेखाजोखा सादर

    Nilesh Rane : नीलेश राणे म्हणाले- रवींद्र चव्हाण यांच्याबद्दल माझ्या मनात आदर, आमच्यात वाद नाही