• Download App
    Pawar uncle nephew will lose local elections in Maharashtra पवार काका - पुतण्यांना एकमेकांच्या कुबड्या हव्यात; नाहीतर स्वबळावर लढल्यास दोघेही जातील तोट्यात!!

    पवार काका – पुतण्यांना एकमेकांच्या कुबड्या हव्यात; नाहीतर स्वबळावर लढल्यास दोघेही जातील तोट्यात!!

    Pawar uncle

     

    नाशिक : पवार काका – पुतण्यांना एकमेकांच्या कुबड्या हव्यात; नाहीतर स्वबळावर लढल्यास दोघेही जातील तोट्यात!!, हेच राजकीय वास्तव एका सर्वेक्षणातून समोर आले. पवार काका – पुतण्यांच्या दोन्ही राष्ट्रवादींना महाराष्ट्राच्या जनतेची किंवा 5 % सुद्धा पसंतीची पावती मिळाली नाही. सगळा महाराष्ट्र तळहातावरच्या रेषांप्रमाणे ओळखणाऱ्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीला जनतेने फक्त 3 % पसंती दिली. यातून पवारांचा संपूर्ण महाराष्ट्रव्यापी नेतृत्व करण्याचा दावाही फोल ठरला.Pawar uncle nephew will lose local elections in Maharashtra

    देवेंद्र फडणवीस यांच्या महायुती सरकारच्या वर्षपूर्ती निमित्त वेगवेगळ्या वर्तमानपत्रांनी मोठ-मोठी सर्वेक्षणे घेतली. त्यातल्या पुढारीच्या सर्वेक्षणातून सर्व पक्षांचे “स्वबळ” किती मोठे आहे??, याचे राजकीय वास्तव बाहेर आले. ते सगळ्याच राजकीय पक्षांना आरसा दाखवून गेले.



    – पवारांच्या नेतृत्वाचा फुगा फुटला

    शरद पवारांच्या नेतृत्वाचा फुगा त्यांच्या समर्थकांनी कितीही फुगवून दाखविला, तरी प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या जनतेला मात्र त्यांचे नेतृत्व मान्य नाही, हेच पुढारीच्या सर्वेक्षणातून समोर आले. शरद पवार आणि अजित पवार यांच्या दोन्ही राष्ट्रवादींना महाराष्ट्रातल्या जनतेने 5 % पेक्षा कमी मते दिली. त्यावर भाजपला 35 %, तर काँग्रेसला 20 % लोकांनी पसंती दिली. याचा अर्थ महाराष्ट्राच्या जनतेचा प्रादेशिक पक्षांपेक्षा राष्ट्रीय पक्षांवर जास्त विश्वास असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्रात शरद पवारांच्या पेक्षा देवेंद्र फडणवीस यांचे नेतृत्व महाराष्ट्रव्यापी ठरले. महाराष्ट्राच्या जनतेने देवेंद्र फडणवीस यांना 40 % पेक्षा जास्त मते देऊन त्यांना संपूर्ण महाराष्ट्राचे पुढारी ठरविले.

    – दोन्ही शिवसेनांचाही तोटा

    ज्याप्रमाणे महाराष्ट्राच्या जनतेने शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादींना नाकारले त्याचप्रमाणे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनांना देखील फारच मर्यादित पाठिंबा दिला. दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले तरच त्यांचे अस्तित्व टिकून राहील हे राजकीय वास्तव सुद्धा या सर्वेक्षणातून समोर आले.

    – हिंदुत्ववाद्यांमध्येच मुख्यमंत्री पदासाठी स्पर्धा

    या सर्वेक्षणाचे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य ठरले, ते म्हणजे हिंदुत्ववाद मानणाऱ्या नेत्यांमध्येच मुख्यमंत्रीपदासाठी मुख्य स्पर्धा असल्याचे स्पष्ट झाले. महाराष्ट्राच्या जनतेने सर्वात पसंती देवेंद्र फडणवीस यांना दिली. त्यांना 40 % मते मिळाली त्यांच्या पाठोपाठ एकनाथ शिंदेंना 18 % मते मिळाली, तर उद्धव ठाकरे यांना 15 % मिळाले मते मिळाली. अजित पवार फक्त आठ % मते मिळवू शकले. त्यांच्याबरोबरच काँग्रेसी विचारसरणीच्या बाकीच्या नेत्यांची टक्केवारी फारच नगण्य राहिली. याचा अर्थ महाराष्ट्रात काँग्रेसी विचारसरणीची पूर्ण घसरण झाली. काँग्रेसचे नेते आणि शरद पवार यांच्यासारखे मोठे नेते सुद्धा काँग्रेसची विचारसरणी महाराष्ट्रात पुरती रुजवू शकले नाहीत, हेच राजकीय वास्तव या सर्वेक्षणातून समोर आले.

    Pawar uncle nephew will lose local elections in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

     

    Related posts

    संख्याबळ कमवा आणि विरोधी पक्षनेते पद मिळवा; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना टोला!!

    विरोधकांना 10 % वर आणून ठेवायची जबाबदारी सरकारची आहे का??

    Supriya Sule : बारामती नगरपरिषद निवडणूक लढवणारे कार्यकर्ते वाऱ्यावर; सुप्रिया सुळे भाजप खासदाराच्या मुलीच्या लग्नात नाचल्या डान्स फ्लोअर वर!!