विशेष प्रतिनिधी
मुंबई : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली हजारो मराठा मुंबईत दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर पवार आणि ठाकरे यांच्या नेत्यांनी त्या आंदोलनात घुसखोरी केली आहे. पण त्याचवेळी पवार आणि ठाकरे यांची ओबीसींमधून मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत भूमिका मात्र संशयाच्या घेऱ्यात आली आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मराठा समाजाला ओबीसी समाजाच्या आरक्षणांमधून आरक्षण द्यावे, अशी जाहीर भूमिका अद्याप तरी घेतलेली नाही किंवा तसे वक्तव्य देखील केल्याचे समोर आलेले नाही. पण पवार आणि ठाकरे यांच्या पक्षांच्या नेत्यांनी मराठा आरक्षण आंदोलनात मात्र घुसखोरी केली आहे.
विसंगतीवर बोट
भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटलंय की, मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस पक्ष. मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मोर्चा’ म्हणून हेटाळणी करणारे सामना. आरक्षणचे विषय आता नको म्हणणारे शरद पवार आणि वर्षानुवर्षे मराठा समाज केवळ मतपेढी म्हणून पाहणारा काँग्रेस पक्ष. आजही हे तिघेही केवळ राजकारण करू पहात आहेत. ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मनोज जरांगे यांच्या मागणीवर हे तिघेही मूग गिळून गप्प आहेत.
मराठा समाजाचे मुंबईतील आंदोलन हे शांततामय ऐतिहासिक होईलच, पण या आंदोलनाबाबत बोलतय कोण? …
महाविकास आघाडी सरकारच्या काळात मराठा समाजाकडे दुर्लक्ष करणारे उध्दव ठाकरे, शरद पवार आणि कॉंग्रेस पक्ष
मराठा समाजाच्या मूक मोर्चाची ‘मुका मो’र्चा म्हणून हेटाळणी करणारे सामना
मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका करावी, पण…
आता या पक्षांनी आपली भूमिका स्पष्ट केली पाहिजे. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे ही भाजपाची भूमिका आहे. याबाबत कायदेशीर बाबी भक्कम करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मनोज जरांगे यांनी सरकारवर टीका करावी, लोकशाहीतील तो अधिकारच आहे. पण आता शरद पवार, उद्धव ठाकरे व काँग्रेस पक्षाकडे त्यांच्या मागणीबाबत स्पष्टता मागायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.
देवेंद्रजी यांचे सरकार सर्वाधिक संवेदनशील
- केशव उपाध्ये पुढे म्हणाले की, कारण सर्वाधिक संवेदनशील हे देवेंद्रजी यांचे सरकार आहे व मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय हा देवेंद्रजी यांनी घेतला, आताही अशा वेळी त्यांच्या नावाने टीका करून काय साध्य करीत आहोत?
- मराठा समाजाला 10 % आरक्षण महायुती सरकार असतानाच मिळाले. सध्या सर्वोच्च न्यायालयाने हे आरक्षण रद्द केलेले नाही.
- शिंदे समितीस मुदतवाढ मिळावी ही त्यांची मागणी होती, त्याला सहा महिने मुदत वाढ दिली.
- मराठा आंदोलनात मृत्युमुखी पडलेल्यांना नोकरी मिळावी, अशी मागणी होती ती सुध्दा जवळपास पूर्ण झाली.
- अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळातून मराठा समाजातील एक लाख उद्योजक निर्माण करण्यासाठी, 8320 कोटींचे कर्ज वाटप केले.
- राजर्षी शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजनेतून मराठा समाजातील 17.54 लाख विद्यार्थ्यांना 9262 कोटी दिले.
या तीन पक्षांचे राजकारण हाणून पाडा
मराठा समाजाला न्याय देणारे देवेंद्र फडणवीस आणि या उलट कोणतीही भूमिका न घेणारे काँग्रेस, उबाठा, शरद पवार… महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाशी द्रोह करणारे हे या तीन पक्षांचे राजकारण हाणून पाडा, असा हल्लाबोल त्यांनी महाविकास आघाडीवर केलाय.
Pawar Thakckrey party leaders infiltrates in Maratha agitation
महत्वाच्या बातम्या
- Cotton : कापड व्यापारी 31 डिसेंबरपर्यंत टॅरिफमुक्त कापूस आयात करू शकतील; वस्त्रोद्योग क्षेत्राला 50% अमेरिकन टॅरिफपासून वाचवण्याचा निर्णय
- Justice Nagaratna : न्यायमूर्ती नागरत्ना SCच्या कॉलेजियमशी असहमत; न्यायमूर्ती विपुल पंचोलींच्या SCत नियुक्तीवर आक्षेप
- जेव्हा संघाने चालविल्या होत्या काँग्रेसच्या NSUI अधिवेशनसाठी खानावळी; डॉ. मोहन भागवतांनी सांगितली त्यांची कहाणी!!
- Commonwealth Games : 2030 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारत बोली लावणार; मंत्रिमंडळाची मंजुरी, अंतिम मुदत 31 ऑगस्ट