प्रतिनिधी
मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघ भाजप 50 टक्क्यांपेक्षा जास्त मते घेऊन जिंकणार असल्याचा दावा केल्याबरोबर शरद पवारांनी चंद्रशेखर बावनकुळे यांची “लायकी” काढली.Pawar removed Bawankule’s “deserving”; BJP took out the dagger attitude of Pawar!!
ज्या नेत्याला त्यांच्या पक्षाने विधानसभा निवडणुकीचे तिकीट द्यायलाही “लायक” समजले नाही, त्या नेत्याविषयी आपण बोलायची काय गरज आहे??, अशा शब्दांत शरद पवारांनी बावनकुळे यांना झटकण्याचा प्रयत्न केला. बारामती जिंकणे एवढे सोपे नाही, असा इशारा पवारांनी या वक्तव्यातून भाजपला दिला.
पण शरद पवारांच्या याच इशाऱ्यावर प्रदेश भाजपने आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून ठाम प्रत्युत्तर देत पवारांची खंजीर खुपशी वृत्तीच बाहेर काढली.
या ट्विटमध्ये प्रदेश भाजपने म्हटले :
शरद पवार साहेब, आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी राजकारणात आले तेव्हापासून एकाच पक्षात आहेत. त्यांची नाळ भाजपाशी जोडलेली आहे. त्यांनी कधीही पक्ष बदलला नाही, विचार बदलला नाही. काही लोकांनी राजकारणात आल्यापासून पक्ष किती बदलले आणि किती वेळा विचार बदलले हे मोजताही येणार नाही. स्वतःच्या स्वार्थासाठी गुरुच्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या व्यक्तीनं पक्षनिष्ठ आणि प्रामाणिक माणसाबद्दल फार बोलू नये. ज्या काँग्रेसने तुम्हाला पक्ष विरोधी कारवायांसाठी पक्षातून काढले त्याच काँग्रेससोबत तुम्ही पुन्हा युती केली! ही कृती तुमच्या कोणत्या स्वाभिमानात बसते? पवार साहेब तुमच्या याच खोट्या आणि दलबदलू प्रवृत्तीमुळे तुमचा संपूर्ण पक्ष फुटला. जीवाभावाची माणसं सोडून गेली. ती का गेलीत? तुम्ही कधी आत्मपरीक्षण करणार आहात की नाही?
पवारांना अशा प्रकारचे प्रत्युत्तर देत भाजपने पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणत्या वृत्तीमुळे फुटला हेच दर्शवून दिले.
Pawar removed Bawankule’s “deserving”; BJP took out the dagger attitude of Pawar!!
महत्वाच्या बातम्या
- महुआ मोईत्रा वादापासून TMCने राखले अंतर; म्हटले- जो वादात अडकला, त्यानेच बोलावे; निशिकांत दुबे यांची लोकपालकडे तक्रार
- भारताचा मोस्ट वॉन्टेड लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक पाकिस्तानात ठार
- खासदार महुआ मोईत्रांच्या लाचखोरीतून प्रश्न घोटाळ्यातून तृणमूळ काँग्रेसने झटकले हात!!
- महुआ मोईत्राच्या अडचणी वाढण्याची चिन्हं! लोकसभा अध्यक्षांनंतर आता निशिकांत दुबे यांनी केली लोकपालकडे तक्रार