नाशिक : एकटे पवार मालक आणि बाकीचे बटाईदार!!; हेच का पवारांच्या 60 वर्षांच्या संसदीय कारकीर्दीचे लोकशाही संस्कार??, असा सवाल विचारायची वेळ आमदार रोहित पवारांच्या एका ट्विटमुळे आली. Pawar
सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांच्या रायगड जिल्ह्यातल्या एका कार्यक्रमातल्या पोस्टरवर अजित पवार आणि सुनेत्रा पवार यांचे फोटो नव्हते म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना एकदम सुनेत्रा पवारांचा कळवळा आला आणि रोहित पवारांनी मालक आणि बटाईदार अशी तुलना करून सुनील तटकरे आणि आदिती तटकरे यांचा अपमान करणारे ट्विट केले. आदिती तटकरे यांनी पोस्टर संदर्भात खुलासा करून माफी सुद्धा मागितली, पण रोहित पवारांनी त्यानंतर आपले ट्विट मागे घेतले नाही.
– रोहित पवारांचे ट्विट
मालकाला अलगद बाजूला सारून जेंव्हा बटाईदारंच जमिनीचा 7/12 स्वतःच्या नावे करतो, याचं जिवंत उदाहरण..
जे आम्ही वारंवार बोलतोय…, असे ट्विट रोहित पवारांनी केले. रोहित पवारांच्या या ट्विटमधून त्यांची सरंजामशाही वृत्तीच दिसून आली. जणू काही राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे पवारांच्या मालकीचा पक्ष आणि इतर सगळे नेते आणि कार्यकर्ते त्यांचे बटाईदार अशा थाटात रोहित पवारांनी कुठलेही पवार सोडून इतर नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा अपमान केला.
– संस्कारांचे पोकळ ढोल
एरवी शरद पवार आणि सुप्रिया सुळे देशातली लोकशाही मोदी सरकारच्या काळात धोक्यात आल्याचा ढोल पिटतात. आपण स्वतः मात्र लोकशाहीवादी असल्याचे नगारे वाजवतात. सुप्रिया सुळे तर आई – वडिलांच्या संस्कारांची टिमकी मोठमोठ्याने वाजवतात, प्रत्यक्षात खुद्द पवारांच्याच पक्षात आणि त्यांच्या संस्कारात लोकशाही वगैरे काही नाही, आहे ती सरंजामशाहीच आहे, ही वस्तुस्थिती रोहित पवारांच्या एका ट्विटमधून उघड्यावर आली.
– पवारांचे राजकीय सत्य
खरं म्हणजे रोहित पवारांचे हे ट्विट राष्ट्रवादीच्या नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी एक धडा आहे. राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यातून खरं धडा शिकलाच पाहिजे. पवारांवर निष्ठा ठेवताना सावधानतेने वागले पाहिजे. ज्या पवारांवर आपण राजकीय स्वार्थासाठी का होईना, पण निष्ठा ठेवली, तेच पवार राजकीय दृष्ट्या अपयशी ठरल्यानंतर, त्यांच्या अपयशाचे खापर इतर नेत्यांवर आणि कार्यकर्त्यांवर कसे फोडतात आणि ते त्यासाठी कुठल्या थराला जाऊ शकतात, याचे उदाहरण म्हणजे रोहित पवारांचे हे ट्विट आहे. सगळेच पवार स्वतःला मालक समजतात आणि राष्ट्रवादीच्या अन्य नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा बटाईदार म्हणून अपमान करतात, हेच राजकीय सत्य रोहित पवारांच्या ट्विट मधून उघड्यावर आले.
Pawar is the sole owner, and the rest are sharecroppers.
महत्वाच्या बातम्या
- आसाम मधल्या प्रचारात काँग्रेसच्या अध्यक्षांना मनमोहन सिंग यांची आठवण; मोदींवर विश्वासघाताचा आरोप!!\
- दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणानंतर सुनेत्रा पवारांचे नेतृत्व प्रस्थापित आणि सुरक्षित राहील??
- Maharashtra : राज्यात अवकाळी पावसाचा अंदाज; मध्य महाराष्ट्र, खान्देश, मराठवाड्यात गारपिटीची शक्यता
- Bengaluru Professor : प्रोफेसरने विद्यार्थ्याला दहशतवादी म्हटले; पीडितला पाठिंबा दिल्याने इतर विद्यार्थ्यांना निलंबित केले