प्रतिनिधी
सातारा : महाराष्ट्रात शिंदे – फडणवीसांच्या सरकारमध्ये बिलकूल मतैक्य नसून आधी केलेल्या चोऱ्या लपवण्यासाठीच शिंदे, पवार गट सत्तेच्या वळचणीला गेला आहे म्हणून लोकांच्या मनात प्रचंड चीड आहे. जनतेच्या पाठीत खंजीर खुपसून ते सत्तेत सहभागी झाले आहेत, असा हल्लाबोल माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी यांनी केला. शिंदे फडणवीसांच्या सरकारनामा सरकारला एक्सपोज करण्यासाठी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी आता जनतेपर्यंत पोहोचावे, असे आवाहन त्यांनी केले.Pawar group’s diversion of power only to hide the earlier thefts; Attack of Prithviraj Chavan
सातारा जिल्हा काँग्रेस भवनात जिल्हा काँग्रेस कार्यकारणीच्या आढावा बैठकीत श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, जिल्हा निरिक्षक श्रीरंग चव्हाण, ज्येष्ठ नेते उदयसिंह पाटील, महिला जिल्हाध्यक्षा अल्पना यादव, नरेश देसाई, राजेंद्र शेलार, ॲड. विजयराव कणसे, धनश्री महाडिक, रजनी पवार आदी उपस्थित होते.
श्री. चव्हाण म्हणाले, राज्यातील सध्याच्या परिस्थितीला भाजप जबाबदार आहे. अडीच वर्षांपूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी काँग्रेस छोटा पक्ष होता. आता परिस्थिती बदलली आहे. सत्तांतर झाल्यानंतर असून महाविकास आघाडीत काँग्रेस पक्ष मोठा झाला आहे. २०२४ च्या निवडणुकीसाठी महाराष्ट्र महत्वाचे राज्य आहे. काँग्रेसला येथे मोठे यश मिळू शकते.
महाविकास आघाडी एकत्र लढली तर भाजप हरणार हे नक्की आहे. कर्नाटकातील भाजपचा पराभव त्यांना सहन होत नाही. छत्तीसगड, राजस्थानमध्ये भाजप पराभव नक्की आहे. भाजपला महाराष्ट्र पाहिजे असल्यामुळे अमित शाह यांनी शिवसेना व त्यानंतर राष्ट्रवादी फोडली. पण भाजप विरोधात काँग्रेस सर्वशक्तीनिशी
लढणार आहे.
राज्यात वंचितमुळे अनेक ठिकाणी खासदार पडले आणि भाजपला त्याचा फायदा झाला. राज्यातीलही राजकीय परिस्थिती समजून सांगण्यासाठी सध्या चांगली परिस्थिती आहे. त्यामुळे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी तळागाळापर्यंत पोहोचावे. भाजपला नवी व्यवस्था स्थापन करायची असून संभाजी भिडेंसारखा माणूस समाजात विष कालवत सुटला असल्याचा आरोप त्यांनी केला.
Pawar group’s diversion of power only to hide the earlier thefts; Attack of Prithviraj Chavan
महत्वाच्या बातम्या
- 2022 मध्ये दक्षता आयोगाकडे भ्रष्टाचाराच्या 1.15 लाख तक्रारी; गृह मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या 46,000 तक्रारी
- सीएम स्टॅलिन यांनी राज्यपालांना पोस्टमन म्हटले; NEET समाप्त करण्यासाठी DMKचे संपूर्ण तामिळनाडूमध्ये उपोषण
- रोमियो-ज्युलिएट कायद्यावर जनहित याचिका; किशोरवयीनांच्या संमतीने संबंधांना रेप न मानण्याची मागणी, जपानसह अनेक देशांत असा कायदा
- जम्मू-काश्मीरच्या पुलवामामध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक, दोन दहशतवादी ठार