• Download App
    Pawar family land scams, expectations from Modi and fadnavis भूखंडाचे श्रीखंड : पवार फॅमिलीचा झोलझाल, मोदी + फडणवीसांच्या गळ्यात घाल!!

    भूखंडाचे श्रीखंड : पवार फॅमिलीचा झोलझाल, मोदी + फडणवीसांच्या गळ्यात घाल!!

    Pawar famil

    पवार फॅमिलीचा झोलझाल, मोदी + फडणवीसांच्या गळ्यात घाल!!, असलाच प्रकार कोरेगाव पार्क जमीन घोटाळा बाहेर आल्यापासून काँग्रेस आणि पवार कुटुंबीयांच्या प्रतिक्रियांवरून दिसून राहिलाय.Pawar family land scams, expectations from Modi and fadnavis

    जमीन घोटाळे करणार पवार आणि ते भरून द्यायचे मोदी + फडणवीसांनी अशी अपेक्षा यातून व्यक्त होते आहे. पवारांचे नाव काँग्रेसमध्ये राहून आणि काँग्रेसच्या बाहेर राहून नेहमीच जमीन घोटाळ्यांशी जोडले गेले. मूळात 1989 पासून भूखंडाचे श्रीखंड हा शब्द पवारांची मुकुंद भवन ट्रस्टच्या जमिनीपासून जोडला गेला. कुठेही जमिनीचा मोठा तुकडा दिसला की पवारांचा त्यावर डोळा गेलाच, असे तेव्हापासून बोलले गेले. पण प्रसंगी यंत्रणांना वाकवून मोडून आणि कायद्याचा किस काढून पवार जमीन घोटाळ्यांपासून वाचत गेले आणि तो जमीन घोटाळ्यांचा वारसा पार्थ पवार पर्यंत जे पवारांच्या नातवंडांपर्यंत येऊन पोहोचला.



    पवारांचे भूखंडाचे श्रीखंड

    पवारांशी “भूखंडाचे श्रीखंड” हा शब्द जोडला गेला, तेव्हा काँग्रेसची बळकट राजवट महाराष्ट्रात आणि देशात होती त्यावेळी काँग्रेसच्या राज्यकर्त्यांनी पवारांना फक्त राजकीय दृष्ट्या अटकाव केला, पण त्यांच्या भूखंड व्यवहार आणि गैरव्यवहारांमध्ये फारसे कुठले लक्ष घातले नाही. त्यावेळच्या विरोधकांना फायली पुरवून पवारांना अडचणीत आणणे त्यापलीकडे पवारांना कायद्याच्या कचाट्यात अडकविणे हे काम काँग्रेसी राज्यकर्त्यांनी कधी केले नाही. काँग्रेसचे राज्यकर्ते म्हणजेच महाराष्ट्रातले काँग्रेसचे मुख्यमंत्री नेहमीच पवारांपुढे दबून राहिले. त्याला अपवाद फक्त पृथ्वीराज चव्हाण यांचा ठरला. काँग्रेस हायकमांडने पवारांची डाळ दिल्लीत कधी शिजू दिली नाही, पण महाराष्ट्रात त्यांना पुरते निष्प्रभ केले नाही. काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी पवारांविरुद्ध फक्त काड्या केल्या, पण त्यांनी खऱ्या अर्थाने पवारांच्या नाड्या कधी आवळल्या नाहीत.

    मोदींकडून काँग्रेसची अपेक्षा

    आता तेच काँग्रेसचे नेते पंतप्रधान मोदींना पत्र लिहून त्यांच्याकडून पवारांवर कायद्याच्या कचाट्याची कारवाई करायची अपेक्षा धरत आहेत. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याच्या मुद्द्यावरून राहुल गांधींनी मोदींनाच सवाल केले आहेत. काँग्रेसचे राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी मोदींनाच पत्र लिहून पवारांना वेसण घालायची मागणी केली आहे. पवारांच्या घोटाळ्यांसाठी त्यांनी मोदींना जाब विचारला आहे.

    पवार फॅमिलीच्या गेमा

    पण त्या पलीकडे जाऊन खरी game तर पवारांच्या फॅमिलीने चालविली आहे. एकीकडे पार्थ पवारला वाचविताना दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांना घेरले आहे. अजित पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार आणि शरद पवार यांच्या प्रतिक्रिया पाहिल्या तर ही बाब ठळकपणे समोर येते. पार्थ पवार चुकीचे काही करणार नाही असे सर्टिफिकेट सुप्रिया सुळे यांनी देऊन टाकले, तर पार्थच “फक्त चुकला.” तो चुकांमधून पुढे शिकेल, असे सांगून अजित पवारांनी त्याची पाठराखण केली.

    रोहित “पोपट” बोलला

    पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्यावर रोहित पवार तीन दिवस काही बोललेच नव्हते. एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत प्रत्येकाला उपदेशाचे डोस पाजणारा रोहित पवार नावाचा पार्थच्या जमीन घोटाळ्यावर गप्प बसला होता. पण आज रोहित पवार पुढे येऊन बोलले ते सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनाच घेरणारे ठरले. देवेंद्र फडणवीस यांच्यात मुख्यमंत्री पदाच्या काळात सगळ्यात जास्त जमीन घोटाळे झाले, असा आरोप रोहित पवारांनी केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भोवती असणाऱ्या लोकांवर कारवाई होत नाही आम्ही सिडकोचा जमीन घोटाळा काढला, तेव्हा फडणवीस यांनी कारवाई केली नाही. पण भाजप आणि फडणवीस यांना नको असतील, त्यावर वेगाने कारवाया केल्या जातात असा “जावईशोध” रोहित पवारांनी लावला. पार्थ पवारच्या जमीन घोटाळ्याची सगळी जबाबदारी रोहित पवारांनी फक्त अधिकाऱ्यांवर ढकलली. बाकी बऱ्याच राजकीय मखलाशा रोहित पवारांनी नेहमीच्या पद्धतीने केल्या.

    300 कोटींवर पवार बोलले नाहीत

    स्वतः शरद पवारांनी पार्थ पवार विरुद्ध गुन्हा का नाही??, याचे उत्तर मुख्यमंत्र्यांनी द्यावे असे सांगून हात झटकून टाकले. पार्थ पवार च्या जमीन घोटाळ्याची सगळी जबाबदारी त्यांनी फडणवीस यांच्या गळ्यात टाकली, पण आपण स्वतःच कवडीची किंमत दिली नसलेल्या नातवाने 300 कोटी रुपये गोळा केले कसे??, त्यावर पवारांनी चकार शब्दही काढला नाही.

    वर दिलेल्या उदाहरणांवरून हे स्पष्ट झाले की भूखंडाचे श्रीखंड खायचा प्रकार पवार फॅमिलीने करायचा, त्यावर काँग्रेसने फक्त काड्या करायचा पण पवारांना खऱ्या अर्थाने वेसण घालायची नाही आणि अपेक्षा मात्र मोदींकडून करायच्या. पवार फॅमिलीने सगळ्या उलट्या पालट्या गेमा करायचा आणि त्या देवेंद्र फडणवीसांनी निस्तरायच्या. यात आता मोदी आणि फडणवीस यांची राजकीय विश्वासार्हता पणाला लागली आहे.

    Pawar family land scams, expectations from Modi and fadnavis

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Narayan Rane : उद्धव, राज ठाकरेंमध्ये सत्तेत येण्याची क्षमता नाही, नारायण राणेंची टीका

    1 रुपयाही न घेता शीतल तेजवानीचा पार्थच्या कंपनीशी 300 कोटींचा व्यवहार; की पार्थला 42 कोटी रुपये भरावे लागू नयेत म्हणून यंत्रणांची दिशाभूल करायचाच प्रकार??

    VVPAT : स्थानिक स्वराज्य निवडणुकांत व्हीव्हीपॅटचा मुद्दा न्यायालयात; आयोगाला उच्च न्यायालयाची नोटीस; 18 नोव्हेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश