• Download App
    Pawar family फक्त पवार कुटुंबीयांना Political Immunity; बाकी सगळ्यांना नैतिकता आणि कायद्याची कसोटी!!

    फक्त पवार कुटुंबीयांना Political Immunity; बाकी सगळ्यांना नैतिकता आणि कायद्याची कसोटी!!

    नाशिक : महाराष्ट्रात फक्त पवार कुटुंबीयांना Political Immunity आणि बाकी सगळ्यांना नैतिकता आणि कायद्याची कसोटी!!, हेच राजकीय चित्र अशोक खरात प्रकरणात अडकल्यानंतर रूपाली चाकणकरांना द्यायला लागलेल्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर समोर आले.

    भोंदू बाबा अशोक खरात याचे सगळे प्रकरण वाढल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हस्तक्षेप करून रूपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा लागला किंबहुना त्यांना वर्षा बंगल्यावर बोलवून बडतर्फ करायचा इशारा दिल्यानंतरच रूपाली चाकणकरांनी महाराष्ट्र महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याचे सांगण्यात आले. पण हा राजीनामा देताना सुद्धा त्यांनी मॉडेलिंग करत असल्यासारखी पोज दिल्याबद्दल रूपाली ठोंबरे, सुषमा अंधारे आणि अंजली धमाल यांनी आगपाखड केली. रूपाली चाकणकर यांच्या भोवती चौकशी आणि तपासाचा फास आवळत चालल्याच्या बातम्या देखील समोर आल्या.

    – राष्ट्रवादीच्या तीन विकेट पडल्या

    पण नैतिकता आणि कायदेशीर कसोटी या मुद्द्यावर फक्त रूपाली चाकणकरांचाच राजीनामा घेतला गेला असे नाही, तर यापूर्वी संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे आणि विधिमंडळाच्या सभागृहात ऑनलाईन पत्ते खेळण्याच्या मुद्द्यावर माणिकराव कोकाटे या दोन मंत्र्यांच्या विकेटही पडल्या. धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे या दोघांवरही कारवाई करण्यासाठी राष्ट्रवादीतून दबाव वाढला, हे खरे पण त्याआधी राष्ट्रवादीवर वेगळ्यावेगळ्या मार्गांनी दबाव आला होता, पण तो त्यावेळी अजित पवारांनी हॅण्डल करायचा प्रयत्न केला होता. पण अजित पवार सुद्धा धनंजय मुंडे आणि माणिकराव कोकाटे यांना फार काळ वाचवू शकले नव्हते. नैतिकता आणि कायदेशीर कसोटी या दोन्ही मुद्द्यांवर राष्ट्रवादीच्या दोन मंत्र्यांच्या विकेट पडायच्या होत्या, त्या पडल्याच.



    – पार्थ पवार वर मात्र कारवाई नाही

    पण याच दरम्यान पार्थ पवारचे कोरेगाव पार्क मुंढवा जमीन बळकवायचे प्रकरण बाहेर आले. पार्थ पवार नेते सरकारी जमिनीवरचे डल्ला मारायचा “डाव” खेळला. पण तो वेळीच उघडकीस आल्याने पार्थ पवारचा “डाव” साध्य होऊ शकला नाही. पण माणिकराव कोकाटे, धनंजय मुंडे आणि रूपाली चाकणकरांना लावली गेलेली कायदेशीर आणि नैतिकतेची कसोटी मात्र पार्थ पवारला लावली गेली नाही. पार्थच्या जमीन घोटाळ्याचा फारच बभ्रा झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चौकशी आणि तपास समिती नेमली पण तिचा अहवाल अद्याप येऊ दिला नाही. पार्थच्या जमीन घोटाळ्यात अधिकाऱ्यांपर्यंतच कारवाई होऊ शकली. या कारवाईचे दोर पार्थ पवार पर्यंत पोहोचू शकले नाहीत.

    – सुप्रिया सुळेंचे पार्थला “सर्टिफिकेट”

    त्याच दरम्यान अजित पवारांची अकाली एक्झिट झाल्याने अर्थाच्या जमीन घोटाळ्याचा विषय बासनात गुंडाळला गेला. पण त्याच दरम्यान सुप्रिया सुळे यांनी पार्थ असे काही गैरव्यवहार करणार नाही, असे त्याला सर्टिफिकेट देऊन टाकले होते. ते सर्टिफिकेट देण्यासाठी सुप्रिया सुळेंना कुठल्याही वेगळ्या पुराव्यांची गरज भासली नाही. पार्थचा फक्त एक फोन त्यासाठी त्यांना पुरेसा ठरला.

    हे सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवर एकच बाब समोर आली, ती म्हणजे महाराष्ट्रात फक्त पवार कुटुंबीयांना पॉलिटिकल इम्युनिटी मिळाली पण बाकी सगळ्यांना कायदेशीर आणि नैतिकतेची कसोटी लागली. पवार निष्ठ‌ नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी यातून धडा शिकायला हरकत नाही.

    Pawar family has political immunity in Maharashtra

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरातचे 200 कोटींचे ‘बेनामी’ साम्राज्य; पाथर्डीत 150 कोटींची जमीन, आलिशान फार्महाऊस, बेकायदेशीर संपत्ती उघड

    Rupali Chakankar : महिला म्हणून मला सॉफ्ट टार्गेट केले गेले; खरातला मी गुरू मानले होते, दुसरी बाजू माहीत नव्हती; रूपाली चाकणकरांची पहिली प्रतिक्रिया

    Rupali Chakankar : भोंदू अशोक खरात प्रकरण भोवले, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकरांचा अखेर राजीनामा