• Download App
    लोकसभा 2024 : अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करण्याचा आव; पण काका - पुतण्यांचे पक्ष लढणाऱ्या जागांची संख्या 20 च्या आत!! Pawar factor in maharashtra politics is really limited to 1/4 only

    लोकसभा 2024 : अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करण्याचा आव; पण काका – पुतण्यांचे पक्ष लढणाऱ्या जागांची संख्या 20 च्या आत!!

    नाशिक : महाराष्ट्राच्या राजकारणात फार मोठे नाव असलेले आणि अख्ख्या महाराष्ट्रावर राज्य करण्याचा आव आणणारे काका आणि पुतणे प्रत्यक्षात फक्त मीडिया पर्सेप्शनच्या लेव्हलवर खेळतात आणि प्रत्यक्ष निवडणुकीच्या रण मैदानात उतरण्याची वेळ आली की, महाराष्ट्रातल्या निम्म्यापेक्षाही कमी जागा लढवतात, हे चित्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे. Pawar factor in maharashtra politics is really limited to 1/4 only

    महाराष्ट्रात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांचे राष्ट्रवादी या दोन पक्षांच्या लोकसभा जागा लढविण्याची संख्या लक्षात घेतली तर ती जास्तीत जास्त 20 एवढीच भरते.

    लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जागा वाटपात शरद पवार गटाच्या वाट्याला 10 ते 12 जागा, तर महायुतीच्या जागा वाटपात अजित पवारांच्या वाट्याला फक्त 9 जागा येण्याची शक्यता आहे. या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. याचा अर्थ पवार काका – पुतणे मिळून जास्तीत जास्त 20 जागांवर उमेदवार उभे करणार आहेत, असा होतो.

    महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचे पक्ष फुटले आहेत तरी देखील जागा वाटपात उद्धव ठाकरे आघाडीवर दिसत असून त्यांची शिवसेना 20 ते 22 जागा, काँग्रेस 13 ते 15 जागा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस 10 ते 11 जागा लढवणार असल्याची बातमी आहे. याचा अर्थ महाविकास आघाडीत शरद पवार तिसऱ्या स्थानावर आहेत, तर महायुतीच्या जागा वाटपात भाजप पहिल्या क्रमांकावर, शिंदे सेना दुसऱ्या क्रमांकावर आणि अजित पवारांची राष्ट्रवादी तिसऱ्या क्रमांकावर राहण्याची बातमी आहे. त्यातही अजित पवारांच्या राष्ट्रवादीने फक्त 9 जागा देण्याचा आग्रह धरला असल्याचे बातमीत नमूद आहे. या सर्व बातम्या आकड्यांच्या आधारे खऱ्या मानल्या तर पवार काका – पुतणे मिळून त्यांच्या वाट्याला महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा मतदारसंघांपैकी फक्त 20 मतदारसंघ लढण्यापुरते उपलब्ध होणार आहेत.


    २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपा एचडी देवेगौडा यांच्या ‘जेडीएस’शी युती करणार!


    याचा अर्थ पवार नावाचा फॅक्टर माध्यमांनी कितीही फुगवून दाखवला तरी तो प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकारणात किती मर्यादित आहे, हेच स्पष्ट होते. कारण पवार नावाच्या ब्रँड वर जास्तीत जास्त 20 उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. यातून यश मिळणार ते पुन्हा सिंगल डिजिटल हेच चित्र प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या राजकीय पटलावर दिसते.

    लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील 9 जागांसाठी अजित पवार गट आग्रही असल्याची माहिती आहे. यामध्ये छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदार संघाचाही समावेश आहे. अजित पवार गटाला या संभाव्य उमेदवारांच्या मतदारसंघात चाचपणी करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

    राष्ट्रवादीकडे आधी असलेल्या 4 जागा तसेच त्या जागांव्यतिरिक्त आणखी 5 जागांची मागणी अजित पवार गटाने केली आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे 4 खासदार आहेत. यामध्ये बारामती, सातारा, रायगड, शिरूर या चार लोकसभा मतदार संघांचा समावेश आहे. या व्यतिरीक्त अजित पवार गटाने धाराशिव, परभणी, दक्षिण मुंबई, भंडारा गोंदिया आणि छत्रपती संभाजीनगर या 5 लोकसभा मतदार संघाची मागणी केली आहे. रायगड लोकसभा मतदार संघात वादाची शक्यता आहे.

    पण या सगळ्या मागण्यांचा राजकीय अर्थ महाराष्ट्राच्या राजकारणात पवार नावाचा फॅक्टर खऱ्या अर्थाने फक्त 1/4 एवढाच चालतो हा आहे.

    Pawar factor in maharashtra politics is really limited to 1/4 only

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ

    Dadar station : महाराष्ट्रात सतर्कता; दादर स्टेशनजवळ स्वामीनारायण मंदिरात पोलिसांकडून मॉक ड्रिल; मुख्यमंत्र्यांची बैठक

    Mumbai Metro ‘मुंबई मेट्रो मार्ग 3, टप्पा 2’ सेवेचा शुभारंभ ; फडणवीसांनी दाखवला हिरवा झेंडा