• Download App
    मंत्रिमंडळ विस्ताराला विलंबावरून पवारांची टीका : सगळं दिल्लीतूनच ठरतंय, शिंदे-फडणवीस यांच्या हातात काहीच नाही |Pawar criticizes delay in cabinet expansion: Everything is decided from Delhi, Shinde-Fadnavis has nothing in hand

    मंत्रिमंडळ विस्ताराला विलंबावरून पवारांची टीका ; सगळं दिल्लीतूनच ठरतंय, शिंदे-फडणवीस यांच्या हातात काहीच नाही

    प्रतिनिधी

    पुणे : राज्यातील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांचा शपथविधी होऊन 35 दिवसांपेक्षा जास्त दिवस झाले आहेत. तरी मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर करू लवकर करू, असं सांगायचे बंद करावं. शिंदे आणि फडणवीस यांच्या हाती काहीच नाही. सर्व दिल्लीमधूनच ठरते. पूर्वी महाराष्ट्रात सर्व ठरत होते, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. Pawar criticizes delay in cabinet expansion: Everything is decided from Delhi, Shinde-Fadnavis has nothing in hand

    अजित पवार यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सोमवार पेठेतील जनसंपर्क कार्यालयाचे शनिवारी उद्घाटन झाले. त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी अजित पवार म्हणाले, आता महिना झाला तरी पालकमंत्री नाही की मंत्रिमंडळ नाही. सरकारकडून जनतेच्या हिताच्या दृष्टीने जे निर्णय घ्यायचे ते निर्णय घेतले जात नाहीत. त्यामुळे आम्ही मंत्रिमंडळ विस्तार करा, असे सांगत आहोत. मात्र लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांना अधिकार नाहीत. याबाबत शिंदेंनी उत्तर द्यायला हवे.



    दिल्लीवारी केल्याशिवाय मंत्रिमंडळ अस्तिवात येणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीमुळेही मंत्रिमंडळ विस्तार थांबवल्याचे आता समोर येत आहे.

    पूर्वी निर्णय महाराष्ट्रात होत होते

    सर्व मीडिया यांना विचारतो, कधी मंत्रिमंडळ विस्तार होणार? हे म्हणतात लवकरच, लवकरच, लवकरच. आम्ही दोघे आहोत, आम्ही दोघे आहोत. मला त्या दोघांवर टीका करायची नाही. या दोघांच्या हातात काहीच नाही. दिल्लीत सर्व ठरते. पूर्वी निर्णय महाराष्ट्रात होत होते, असा टोला पवार यांनी लगावला.

    उद्धव ठाकरेंसोबत असताना शिस्तीने वागायचे

    पवार म्हणाले, कायद्याचे, नियमांचे उल्लंघन होऊ देऊ नका. मुख्यमंत्री मध्यरात्री हॉस्पिटलमध्ये गेले, तिथे घोषणा सुरू होत्या. बाकीच्या लोकांना त्याचा त्रास होतो, असे म्हणत एकनाथराव उद्धव ठाकरेंसोबत काम करताना शिस्तीने वागायचे. आता वेगळेच सुरू आहे. रात्री दहानंतरही त्यांचा माइक सुरू असतो.

    Pawar criticizes delay in cabinet expansion: Everything is decided from Delhi, Shinde-Fadnavis has nothing in hand

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस