विशेष प्रतिनिधी
मुंबई : Pavan Tripathi मुंबई महानगरपालिका निवडणुकीचा रणसंग्राम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. मुंबई भाजपाचे महामंत्री आचार्य पवन त्रिपाठी यांनी ठाकरे बंधूंच्या (उद्धव आणि राज ठाकरे) ‘मराठी कार्ड’वर जोरदार हल्ला चढवत भाजपाच्या विजयाचा निर्धार व्यक्त केला आहे. “मुंबईचा महापौर हा केवळ मराठीच नाही, तर प्रखर हिंदूच असेल,” अशा शब्दांत त्रिपाठी यांनी विरोधकांना ललकारले आहे.Pavan Tripathi
आचार्य पवन त्रिपाठी यांनी ठाकरे गटाच्या भावनिक राजकारणावर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आधीच स्पष्ट केले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणाराच मुंबईचा महापौर होईल. मराठीच्या गप्पा मारणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे की, मुंबईत बॉम्बस्फोट घडवणारा दाऊद इब्राहिमही कोकणचा आणि मराठीच होता. मग ठाकरे बंधू दाऊदसारख्या दहशतवादी विचारसरणीच्या माणसाला महापौर करणार का? मुंबईची जनता हे कधीही सहन करणार नाही.”Pavan Tripathi
25 वर्षांत शिवसेनेने काय दिले?
त्रिपाठी यांनी शिवसेनेच्या २५ वर्षांच्या सत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “गेल्या अडीच दशकात बीएमसीवर काबीज असलेल्या शिवसेनेला मुंबईसाठी केलेली पाच ठोस विकासकामेही सांगता येणार नाहीत. याउलट, पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही मेट्रोचे जाळे विणले, कोस्टल रोड उभारला आणि अटल सेतूच्या माध्यमातून मुंबईकरांचा प्रवास सुखकर केला. आम्ही केवळ घोषणा करत नाही, तर काम करून दाखवतो,” असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
काँग्रेस-वंचित युतीवर टीका
काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या युतीवर निशाणा साधताना त्रिपाठी म्हणाले की, “काँग्रेसकडे २२७ जागांवर उमेदवार उभे करण्याची ताकद उरलेली नाही. केवळ भाजपाच सर्व जागांवर ताकदीने लढत आहे. या मजबुरीच्या युतीचा महायुतीवर कोणताही परिणाम होणार नाही,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
Pavan Tripathi Slams Thackeray Brothers Mumbai Mayor Hindu Marathi Photos VIDEOS
महत्वाच्या बातम्या
- सुप्रिया सुळेंचे केंद्रीय मंत्रिपद अजितदादांनी फेटाळले; दुसऱ्या फुटीच्या भीतीने दोन राष्ट्रवादींचे ऐक्यही टाळले!!
- मुख्यमंत्र्यांच्या जाळ्यात अजितदादा अडकले; बाजीराव पेशव्यांना “कर्तृत्ववान” म्हणावे लागले!!
- Supreme Court : सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकार-निवडणूक आयुक्तांना नोटीस; निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीवर मागितले उत्तर
- ED raids : I-PAC छापेमारी वाद; ईडीची सर्वोच्च न्यायालयात याचिका; ममता यांच्यावर चौकशी थांबवल्याचा आणि पुरावे नष्ट केल्याचा आरोप