• Download App
    पत्राचाळ घोटाळा : वर्षा राऊत यांची ९ तास चौकशी, खात्यावरील व्यवहारांचा तपास सुरू|patra chawl scam Varsha Raut interrogated for 9 hours, investigation into account transactions underway

    पत्राचाळ घोटाळा : वर्षा राऊत यांची ९ तास चौकशी, खात्यावरील व्यवहारांचा तपास सुरू

    प्रतिनिधी

    मुंबई : पत्राचाळ घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांची ईडीने तब्बल 9 तास चौकशी केली. रात्री 8 वाजता त्या ईडी कार्यालयातून बाहेर आल्या. वर्षा राऊत यांच्या बँक खात्यातून कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचा ईडीचा आरोप आहे.patra chawl scam Varsha Raut interrogated for 9 hours, investigation into account transactions underway

    हे पैसे खात्यात आले कसे, याबाबत वर्षा राऊत यांची चौकशी झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

    संजय राऊत आणि वर्षा राऊत यांच्या खात्यात प्रवीण राऊत याने १ कोटी ६ लाख रुपये हस्तांतरित केले होते. याच पैशातून राऊतांनी अलिबागमध्ये जमीन खरेदी केल्याचा दावा ईडीने केला आहे. ईडीकडून वर्षा यांच्या खात्यांची कसून तपासणी सुरू आहे.



    संजय राऊत, प्रवीण राऊत आणि एचडीआयएलचे प्रवर्तक राकेश वाधवान आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवान यांनी प्रकल्प पूर्ण न करता पैसे लाटल्याचा आरोप आहे. याप्रकरणी गुरू आशिष कन्स्ट्रक्शनच्या काही जणांना पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते. पत्राचाळप्रकरणी संजय राऊत यांना ३१ जुलै रोजी मध्यरात्री अटक करण्यात आली होती.

    patra chawl scam Varsha Raut interrogated for 9 hours, investigation into account transactions underway

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ