वृत्तसंस्था
मुंबई : मुंबई-अलिबाग जलवाहतूक बंद केल्याने प्रवाशांची कुचंबणा होत आहे. ही वाहतूक आजपासून दोन दिवस बंद राहणार आहे. एसटी बससेवाही बंद असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. Passengers embarrassed by closure of Mumbai-Alibag waterway; Bus strike due to ST strike
मुंबई-अलिबाग या मार्गे दररोज सुमारे साडेतीन हजार जण प्रवास करतात. शनिवार रविवारी प्रवाशांची संख्या आठ ते दहा हजारांपर्यंत पोचते.
एकीकडे एसटी कर्मचाऱ्यांचा संप आणि दुसरीकडे जलवाहतूक बंद झाली आहे. प्रवाशांना खाजगी वाहने आणि शेअर टॅक्सीचा वापर करून मुंबई आणि पनवेल गाठण्याची वेळ आली आहे. यामुळे आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे.
पगारवाढ मिळूनही अलिबागच्या एसटी कर्मचाऱ्यांनी संप सुरुच ठेवला आहे. त्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. दुसरीकडे नौदल सप्ताहामुळे मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया ते मांडवादरम्यानची जलवाहतूक २ ते ४ डिसेंबर अशी तीन दिवस बंद ठेवली आहे. त्यामुळे मुंबईत आणि अलिबागच्या पर्यटकांची दुहेरी कोंडी झाली आहे.
Passengers embarrassed by closure of Mumbai-Alibag waterway; Bus strike due to ST strike
महत्त्वाच्या बातम्या
- GREAT GADKARI : आऊट ऑफ बॉक्स संकल्पना ! शहरांमधील सांडपाणी- घनकचरा वापरून तयार होणाऱ्या ग्रीन हायड्रोजनवर चालणार बस-ट्रक-कार
- महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह सात राज्यांना झायडस कॅडिलाची जायकोव्ह-डी लस मिळणार ; सध्या प्राधान्याने प्रौढ नागरिकांना लस देणार
- कतरिना, विकीचे शुभमंगल केव्हा लागणार ? चाहत्यांसह पाहुण्यांमध्ये मोठी उत्सुकता
- हेल्मेट घालून लालपरी चालविली; एसटी संपामुळे दुखापत टाळण्यासाठी चालकाची अनोखी युक्ती