• Download App
    Partha Pawar बारामतीत पवारांच्या मक्तेदारीला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आव्हान दिल्याबरोबर पार्थ पवारांची दमबाजीची भाषा; काँग्रेसचा downfall "दिसला"!!

    बारामतीत पवारांच्या मक्तेदारीला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आव्हान दिल्याबरोबर पार्थ पवारांची दमबाजीची भाषा; काँग्रेसचा downfall “दिसला”!!

    नाशिक : बारामती विधानसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या कार्यकर्त्याने पवारांच्या मक्तेदारीला आव्हान दिल्याबरोबर पवारांचा तीळपापड झाला. काँग्रेसला महाराष्ट्रात काय त्रास होईल हे दिसेल, अशी दमबाजीची भाषा वापरली. पण त्याचवेळी दुसरीकडे राहुरीत मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीने निवडणूक लढवायची तयारी करून एक नव्हे तर दोन एबीबी फॉर्म पाठवून दिले. Partha Pawar

    बारामतीत सुनेत्रा पवारांनी आज पोटनिवडणुकीसाठी अर्ज भरला त्यांच्या पाठोपाठ काँग्रेसचे कार्यकर्ते आकाश मोरे यांनी देखील अर्ज दाखल केला. त्यापूर्वी सगळ्याच पवारांनी एकत्र येऊन बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करायचा प्रयत्न केला त्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा साथ दिली.

    पण काँग्रेसच्या नेत्यांनी बारामतीची निवडणूक सध्या तरी बिनविरोध करायची नाही हा चंग बांधत आकाश मोरे यांना उमेदवारी अर्ज दाखल करायला सांगितले. त्यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हजर राहिले नाहीत पण म्हणून आकाश मोरे यांचा अर्ज दाखल व्हायचे राहिले नाही.

    पवारांचा डाव फसला

    त्यामुळे बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करायचा सगळ्याच पवारांचा डाव फसला. बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करून पवारांचे वर्चस्व कायम टिकविणे हा त्यांचा हेतू होता. पण आता निवडणूक लढवून वर्चस्व सिद्ध करावे लागेल हे लक्षात येताच सगळ्या पवारांचा तीळपापड झाला. त्यातूनच पार्थ पवार यांनी दमबाजीची भाषा वापरली.



    – पार्थ पवारांची दमबाजी

    लोक विसरत नाहीत लोकांचे दादांवर प्रेम होते पण एवढ्या मोठ्या मॅच्युअर पार्टीने निवडणूक लढवायचा निर्णय घेतला. त्यांच्याकडे सगळे मोठे लोक आहेत. पण त्यांनी चुकीचा निर्णय घेतलाय. आपण कोणाला थांबवू शकत नाही. जे नशिबात असेल, त्याला सामोरे जाऊ. आम्ही कोणाला फोन करणार नाही. पण मला वाईट वाटते. महाराष्ट्रात काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झालाय. त्यांच्याकडे सगळे मोठे लोक आहेत. त्यांनी काय तो विचार केला असेल, तर करू द्यात. पण नंतर महाराष्ट्रात काँग्रेसला काय त्रास होईल तो त्यांना दिसेल, अशी दमबाजीची भाषा पार्थ पवारांनी वापरली.

    – राहुरीत मात्र “डबल गेम”

    पण बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी धाय मोकलणाऱ्या सगळ्याच पवारांनी राहुरी विधानसभा पोटनिवडणूक मात्र बिनविरोध होऊ दिली नाही. शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने एक नाहीतर दोन एबी फॉर्म राहुरीत पाठवून दिले. प्राजक्त तनपुरे यांनी ऐकले नाही आणि उमेदवारी केली नाही, तर पर्याय म्हणून गोविंद मोकाटे यांना फॉर्म द्यायचे राष्ट्रवादीने ठरविले. देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून प्राजक्ता तनपुरे यांना पटविले म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसने “डबल गेम” करत राहुरीत दोन एबी फॉर्म पाठविले.

    Partha Pawar Threatened Congress over Baramati byelection

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Kalyan-Ahilyanagar : कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर एसटी बस खोल खड्ड्यात कोसळली; चालकासह दोघांचा जागीच मृत्यू, 20 जण जखमी

    CM Devendra Fadnavis : 30 जूनपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार; CM देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; पार्थ पवारांची भेट आणि मराठा आरक्षणावरही मांडली भूमिका

    पंचपरिवर्तन हाच आजच्या हिंदुत्वाचा युगधर्म; संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबाळेंचे प्रतिपादन