नाशिक : अजित पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या समर्थनाचे पहिल्यांदाच स्वीट करून पार्थ पवारने रोहित पवार शरद पवारांच्या राष्ट्रवादीतल्या सगळ्या नेत्यांना जोरदार धक्का दिला.
अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर विलीनीकरणाच्या मुद्द्यावर रोहित पवार आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधले बाकीच्या नेत्यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना वारंवार टार्गेट केले. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर तीनच दिवसांनी सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्री म्हणून शपथविधी झाल्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या अनेक नेत्यांचा पापड मोडला. त्यांच्या हातात तोंडाशी आलेला सत्तेचा घास हिरावला गेला. त्यामुळे रोहित पवार, जयंत पाटील, शशिकांत शिंदे यांच्यासारख्या नेत्यांना हात चोळत बसण्याशिवाय पर्याय उरला नाही.
– रोहित पवारचे राजकीय थैमान
पण याच दरम्यान रोहित पवारांनी अजित पवारांच्या विमान अपघाताला घातपात ठरवायचा चंग बांधून दिल्ली पासून मुंबई पर्यंत जोरदार राजकीय थैमान घातले. त्यामध्ये त्यांनी प्रामुख्याने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनाच दोषी ठरवून टार्गेट केले. शरद पवारांच्या घराण्यातले रोहित पवार जर प्रफुल्ल पटेल आणि तटकरे यांना टार्गेट करत असतील, तर आपण कशाला मागे राहायचे असे समजून शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस मधले बाकीचे नेते सुद्धा पटेल आणि तटकरे यांच्या मागे हात धुवून लागले.
पण गेल्या दोन महिन्यांमध्ये सुनेत्रा पवार पार्थ पवार किंवा जय पवार यांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पाठीशी उभे राहाणे टाळले होते.
– पार्थ पवारचे ट्विट
पण आज सुनेत्रा पवारांच्या दिल्ली दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पार्थ पवारने ट्विट करून प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची बाजू उचलून धरली. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या संदर्भात खोटे narrative पसरविण्यात आले. खोट्या बातम्या पसरविल्या गेल्या. हे दोन्हीही नेते आम्हाला कायम मार्गदर्शन करत राहतील, अशा आशयाचे ट्विट पार्थ पवारने केले. त्यामुळे पहिल्यांदाच अजित पवारांच्या कुटुंबातला महत्त्वाचा घटक पटेल आणि तटकरे यांच्या पाठीशी उभा राहिल्याचे चित्र निर्माण झाले. अर्थातच रोहित पवार आणि शरद पवारांच्या पक्षाच्या बाकीच्या नेत्यांना यातून मोठा धक्का लागला.
– दिल्लीच्या राजकारणात पटेल, तटकरेंची आवश्यकता
दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसवर पवारांच्याच कुटुंबाचे वर्चस्व राहणार हे राजकीय सत्य असले, तरी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे या दोन्ही नेत्यांची उपयुक्तता आणि उपद्रव मूल्य टाळून चालणार नाही, हेच राजकीय सत्य सुद्धा या निमित्ताने समोर आले. कारण शरद पवारांच्या गोटातले दिल्लीचे राजकारण हलवायला सुप्रिया सुळे आणि शरद पवार स्वतः तिथे आहेत पण सुनेत्र पवारांच्या गोटातले दिल्लीतले राजकारण हलवायचे असेल, तर त्यांना अजून तरी पार्थ पवार वर अवलंबून राहता येणार नाही. त्यासाठी त्यांना प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांची गरज भासेलच भासेल. या दोन्ही नेत्यांच्या मदतीखेरीज सुनेत्रा पवारांना दिल्लीत दुसरा पर्याय नाही. म्हणूनच पार्थ पवारने प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या समर्थनाचे ट्विट करून त्यांचे राजकीय दृष्ट्या “समाधान” करायचा “डाव” खेळला.
Partha Pawar supports Prafulla Patel and Sunil tatkare
महत्वाच्या बातम्या
- Donald Trump : विमानतळाला देणार ट्रम्प यांचे नाव; फ्लोरिडाच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलणार
- नरेंदर कब मिलेगा सिलेंडर??, वंचित बहुजन आघाडीचे 6 एप्रिलला महाराष्ट्रात आंदोलन
- संजय राऊतांचे सूचक ट्विट, शरद पवार महाराष्ट्रात फिरणार!!; पण फिरून काय करणार??
- War Impact : घरांपर्यंत युद्धाची झळ, दूध-किराणा-उपचार सर्व महागणार; दैनंदिन वस्तूंच्या किमती वाढण्याची तयारी