• Download App
    Parth Pawar immature, Sharad Pawar said it again "कवडीची किंमत देत नाही" ते "परिपक्वता किती ते माहिती नाही"; शरद पवारांचा पार्थ वर राग कायम!!

    “कवडीची किंमत देत नाही” ते “परिपक्वता किती ते माहिती नाही”; शरद पवारांचा पार्थ वर राग कायम!!

    Parth Pawar

    नाशिक : “कवडीची किंमत देत नाही” इथपासून ते “परिपक्वता किती ते माहिती नाही”, या शब्दांतपर्यंत शरद पवारांचा पार्थ पवार वरचा राग कायम राहिल्याचे राजकीय सत्य शरद पवारांच्या दिल्लीतल्या पत्रकार परिषदेतल्या वक्तव्यातून आज समोर आले.Parth Pawar immature, Sharad Pawar said it again

    शरद पवारांनी आज राज्यसभेच्या खासदारकीची शपथ घेतल्यानंतर दिल्लीत आपल्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. त्याच्या आधी काही वेळ पार्थ पवारांनी बारामतीत काँग्रेस पक्षावर टीकास्त्र सोडले होते. बारामती विधानसभेची पोटनिवडणूक लढवायचा निर्णय काँग्रेसने घेतला, त्याबद्दल त्या पक्षाला भविष्यात किती त्रास होईल हे काँग्रेसच्या नेत्यांना नंतर कळेल, असा दावा पार्थ पवार यांनी केला होता.



    – त्याच्याकडे परिपक्वता आहे का??

    या मुद्द्यावर शरद पवारांना प्रश्न विचारला असता पवारांनी काँग्रेस पक्षासारख्या मोठ्या पक्षावर वक्तव्य करण्यासाठी परिपक्वता लागते. पार्थ पवार कडे किती परिपक्वता आहे हे मला माहिती नाही, असे वक्तव्य केले. पवारांच्या या वक्तव्यामुळेच त्यांचा पार्थ पवार वरचा राग कायम असल्याचे उघड झाले.

    – कवडीची किंमत नाही

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अखंड असताना पार्थ पवारने सुशांत सिंग प्रकरणात सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेशी ती विसंगत भूमिका होती. त्याबद्दल त्यावेळी शरद पवारांना प्रश्न विचारल्यानंतर आपण पार्थच्या मतांना कवडीचीही किंमत देत नाही. तो इमॅच्युअर आहे, असे वक्तव्य केले होते.

    आज आजच्या पत्रकार परिषदेत शरद पवारांनी काँग्रेस संदर्भात पार्थने केलेल्या वक्तव्यावर नेमक्या त्याच शब्दाचा फक्त मराठीत वापर केला. पार्थला ते अपरिपक्व म्हणाले. निवडणूक लढवतो तेव्हा समोरून कुणीतरी लढणार असल्याचे गृहीत धरूनच लढावे लागते काँग्रेसला उमेदवार देण्याचा अधिकार आहे काँग्रेस सारख्या मोठ्या पक्षावर वक्तव्य करण्यात एवढी परिपक्वता पार्थ कडे आहे की नाही हे माहिती नाही, असे शरद पवार म्हणाल्याने त्यांचा पार्थवरचा राग जसाच्या तसा कायम असल्याचे राजकीय सत्य समोर आले.

    – विलीनीकरणाचा तुकडा

    त्याचवेळी शरद पवारांनी विलीनीकरणाच्या मुद्द्याचा तुकडाच पाडला. अजित पवारांच्या अकाली एक्झिट नंतर आम्ही त्यांचा पक्ष ताब्यात घेण्याचा प्रश्नच नाही. ज्यांना तो पक्ष चालवायचा आहे त्यांचा तो अधिकार आहे त्यांनी कुठल्या नेत्यावर विश्वास ठेवायचा आणि कुठल्या नेत्यावर ठेवायचा नाही हा त्यांचा विषय आहे सध्या तरी विलीनीकरणाचा विषय आमच्या समोर नाही आम्ही आमच्या पक्षाचे काम वाढवायचे ठरविले आहे. माझ्या आजारपणामुळे काही काळ काम स्थगित झाले होते पण लवकरच मी लोकांमध्ये जाऊन काम सुरू करेन, असे शरद पवार म्हणाले. त्यामुळे विलीनीकरणाच्या मुद्द्याचा तुकडा पडला, अशा बातम्या मराठी माध्यमांनी चालविल्या. पण ज्या अर्थी शरद पवारांनी विलीनीकरणाचा तुकडा पाडला, त्यांच्या शब्दांचा तसाच अर्थ घेऊन विलीनीकरण थांबले, असे मानणे राजकीय दृष्ट्या शक्य आहे का??, असा सवाल या निमित्ताने पुन्हा समोर आला.

    Parth Pawar immature, Sharad Pawar said it again

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    मी तर जामिनावर बाहेर; राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल की भाजपच्या आरोपांवरून स्वतःच दिली कबुली??

    JeM Terrorists : ‘टॉय कार’ने दिल्लीत स्फोट घडवण्याचा कट उधळला; जैशच्या दोन दहशतवाद्यांना अटक, महाराष्ट्र एटीएससह दिल्ली पोलिसांची कारवाई

    बारामतीत पवारांच्या मक्तेदारीला काँग्रेसच्या कार्यकर्त्याने आव्हान दिल्याबरोबर पार्थ पवारांची दमबाजीची भाषा; काँग्रेसचा downfall “दिसला”!!