वृत्तसंस्था
पारनेर : पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी लोकप्रतिनिधीच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करण्याचा इशारा दिला आहे. याबाबतची क्लिप त्यांनी प्रसिद्ध केल्यामुळे राज्यात खळबळ उडाली आहे. त्यांचा रोख हा आमदार निलेश लंके यांच्यावर असल्याचे त्यांनी वर्णन केलेल्या प्रसंगातून दिसते.Parner Tehsildar Jyoti Deore’s warning to commit suicide ; MLA Nilesh Lanka is Responsible
आत्महत्या केलेल्या वनअधिकारी दीपाली चव्हाण यांना उद्देशून देवरे यांनी पत्र लिहिलं आहे. त्या म्हणतात, मी लवकरच तुझ्यासोबत येत आहे. महिला म्हणून प्रशासनात होणारा छळ. लोकप्रतिनिधी कसा त्रास देतात. आणि वरिष्ठ त्यांना कसे पाठिशी घालतात याचा उल्लेख त्यांनी केला आहे. कोरोना लसीकरणावरुन आमदार निलेश लंके यांनी एका आरोग्य कर्मचाऱ्याला मारहाण केली होती. नंतर ती तक्रार मागे घेतली. याचा उल्लेखही देवरे यांनी लंके यांचे नाव न घेता केला आहे.
आपल्या विरुद्ध विधीमंडळात प्रश्न मांडणे, दमदाटी करणे, मी मारहाण केल्याची तक्रार माझ्या गाडीच्या चालकाकडून लिहून घेणं, अँट्रोसिटीची तक्रार दाखल करण्याची धमकी देणे असे प्रकार घडल्याने देवरे यांनी क्लिपमध्ये नमूद केले. आपल्या मुलांकडे पाहून आत्महत्या करण्याचे पाऊल उचलण्याचा विचार कधीकधी येतो. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेल्याने हे पाऊल उचल्याचे देवरे यांनी म्हटलं आहे.
ज्योती देवरे आपल्या क्लिपमध्ये म्हणतात..
प्रिय दीपाली चव्हाण घाबरु नकोस मी लवकरच तुझ्या वाटेवर तुला सोबत करण्यासाठी येत आहे. त्याशिवाय दुसरा मार्गच दिसत नाही. तुझ्या वाटेवर दिसते एक आशेची उजळलेली पणती बाकी सारा अंधार दिव्याखालचा. खर तर तू या रस्त्यावरुन गेली तेव्हा मी सूसाईट नोट लिहून रडत कुढत जगणाऱ्या साऱ्या मैत्रिणींना हक्कानं खडसावले होतं, फुलराणी बना तुला शिकवीन चांगला धडा असे पालुपद गा मी पण तेच पालूपद गात होते. पण लक्षात आले त्याचे परिणाम. किती जणांना धडा शिकवायचा पण या चिमुकल्या पंख्यात आताा त्राण राहिले नाही.
तत्वांना मुरड घालून जगता येत नाही. त्यांचे हुजरी करत तळवे चाटता येत नाहीत. लोकप्रतिनिधींच्या तालावर नाचता येत नाही, त्यांनी थूंकलेलं मला चाटत येत नाही. उकिरड्यावर उभ्या असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांच्या धिंडी मला रोखता येत नाही. अन् वरिष्ठांना सांगूनही त्यांना खिंडित गाठता येत नाही. त्यांनी तर खिंडित साहाय्य पोहचविण्याऐवजी मारेकरी पोहचविण्याचे काम केलं. ठिक आहे लोकप्रतिनिधी आणि आपण एक रथ आणि दोन चाक. पण आपल्या चाकांना जरा गती घेतली की आपला घात निश्चित समजावा.
Parner Tehsildar Jyoti Deore’s warning to commit suicide ; MLA Nilesh Lanka is Responsible
महत्वाच्या बातम्या
- गोमुत्र कसले शिंपडताय…??, बाळासाहेबांचे स्मारक जागतिक कीर्तीचे कसे होईल, ते पाहा; नारायण राणेंचा शिवसेनेला टोला
- राज्यांना ओबीसी यादी बनवण्याचा अधिकार मिळाला, राष्ट्रपती कोविंद यांनी विधेयकाला दिली मंजुरी
- कास पठारावरील फुलांची उधळण पर्यटकांना पाहण्यासाठी होणार खुली, 25 ऑगस्टपासून ऑनलाइन बुकिंगद्वारे घेता येणार आनंद