प्रतिनिधी
मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर रात्री उशिरा ही भेट झाली. जवळपास 15 ते 20 मिनिटे त्यांच्यात चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.Parambir Singh met Chief Minister Shinde Anil Deshmukh was accused of extortion of 100 crores in discussion
विविध चर्चांना उधाण
परमबीर सिंह यांनी यांनी केलेल्या आरोपांमुळे अनिल देशमुखांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईतील बार आणि रेस्तराँमधून दरमहा 100 कोटी रुपये वसुलीचा आरोप परमबीर सिंहांनी केला होता.
देशमुख यांना नुकताच जामीन मिळाला आहे. या पार्श्वभूमीवर परमबीर सिंहांनी सीएम शिंदेंची भेट घेणे महत्त्वाचे मानले जात आहे. यामुळे आता पुन्हा अनिल देशमुखांच्या अडचणी वाढणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Parambir Singh met Chief Minister Shinde Anil Deshmukh was accused of extortion of 100 crores in discussion
महत्वाच्या बातम्या
- ममतांची धमकी : भाजपची सत्ता गेल्यावर केंद्रीय तपास संस्था त्यांच्या नेत्यांना कान धरून घराबाहेर काढतील
- मोदी – शाहांना शिव्या ते नेत्यांची बंद खोलीत खुशी; चंद्रकांतदादांवर टीका करताना रोहित पवारांची भाषा घसरली
- शिवसेना सोडली नसती तर भुजबळ कधीच मुख्यमंत्री झाले असते; पवारांसमोर ठाकरेंचे टोले
- पाकिस्तानात बसला आग लागून 18 जिवंत जळाले : सर्व पूरग्रस्त; एसी बिघाडामुळे झाली दुर्घटना