वृत्तसंस्था
नवी दिल्ली – १०० कोटींच्या खंडणीखोरीच्या आरोप प्रकरणात राजीनामा द्यावा लागलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय चौकशी संदर्भात वकील जयश्री पाटील यांनी सुप्रिम कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. Param Bir Singh’s corruption allegations against Anil Deshmukh: Petitioner Dr Jaishri Patil files caveat before SC
अनिल देशमुख सुप्रिम कोर्टात सीबीआय चौकशी रद्द करावी, या मागणीसाठी अर्ज करणार असल्याची माहिती मिळताच जयश्री पाटील यांनी कॅव्हेट दाखल केले. अनिल देशमुखांनी स्वतःला सीबीआय चौकशीपासून बचावासाठी याचिका दाखल केली असली, तरी महाराष्ट्र सरकार अद्याप सुप्रिम कोर्टात पोहचायचे आहे. त्यापूर्वी जयश्री पाटील यांनी कॅव्हेट दाखल केल्याने अनिल देशमुखांच्या याचिकेवर विचार करताना सुप्रिम कोर्टाला जयश्री पाटील यांच्या कॅव्हेटचाही विचार करून निर्णय करावा लागेल.
मूळात परमवीर सिंग हे स्वतःच १०० कोटींच्या खंडणीखोरीच्या चौकशीची मागणी घेऊन सुप्रिम कोर्टात पोहोचले होते. त्यांना सुप्रिम कोर्टाने हे प्रकरण गंभीर आहे, असे सांगून उच्च न्यायालयात अर्ज दाखल करण्यास सांगितले होते. परमवीर सिंग यांनी त्याप्रमाणे मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
पण तिच्यावर निर्णय न देता उच्च न्यायालयाने जयश्री पाटील यांच्या याचिकेवर निर्णय देऊन खंडणीखोरीच्या आरोपांची सीबीआय तपासाचे आदेश दिले. त्यानंतर अनिल देशमुखांना राजीनामा द्यावा लागला. आणि त्यांनी सीबीआय चौकशी रद्द करण्याची याचिका सुप्रिम कोर्टात दाखल केली. पण त्याचवेळी जयश्री पाटील यांनी कॅव्हेट दाखल केल्याने निर्णय करताना सुप्रिम कोर्टाला त्याचाही विचार करावा लागणार आहे.
Param Bir Singh’s corruption allegations against Anil Deshmukh: Petitioner Dr Jaishri Patil files caveat before SC
महत्त्वाच्या बातम्या
- PM Modi Speech : भाजप निवडणुका जिंकण्याची मशीन नव्हे, तर मने जिंकण्याची मोहीम, मोदींचे टीकाकारांना उत्तर
- Covid 19 Updates : देशात सलग तिसऱ्या दिवशी 90 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद, 24 तासांत 446 मृत्यू
- ‘ जो साधूंची हत्या आणि स्त्रीचा अपमान करतो त्याचे पतन निश्चित आहे ‘ : कंगना रनौतचे ‘ ट्विटास्त्र ‘
- आसामात पुन्हा गोंधळ, मतदान केंद्रावर 90 मतदार, पण ईव्हीएममध्ये नोंदली 181 मते; अधिकाऱ्यासह 6 जण निलंबित
- तृणमूल नेत्याच्या घरात सापडले EVM आणि VVPAT, निवडणूक आयोगाने अधिकाऱ्याला केले निलंबित