महाराष्ट्राच्या राजकारणात राज्यसभा निवडणूक, विधान परिषद निवडणुकी पाठोपाठ भाजप ऐवजी पंकजा मुंडे राजकीय चर्चेचा मोठा विषय ठरला आहे. पंकजा मुंडे सध्या भाजपच्या मध्यप्रदेशच्या सहप्रभारी आहेत. त्या महाराष्ट्रात सध्या लक्षही घालत नाहीत. संभाजीनगरचा मोर्चा स्थानिक नेत्यांनी काढला होता एवढे एक विधान सोडले तर पंकज यांनी गेल्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर तोंडही उघडलेले नाही. तरी देखील मराठी माध्यमे पंकजा मुंडे यांचा विषय जोरदार चढवताना दिसत आहेत. त्यातच आता एआयएमआयचे खासदार इम्तियाज जलील यांनी भर घातली आहे. आपण पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांना भेटून नवा पक्ष काढण्याचा दोनदा प्रस्ताव दिला होता, असे खळबळजनक वक्तव्य करून इम्तियाज जलील यांनी पंकजा मुंडे यांच्या राजकीय भवितव्याविषयी ठळक प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे!! Pankaja new party is just Imtiaz’s money
– माध्यमांची बडी विश्लेषणे
आधीच्या घटना घडामोडींवर जशी पंकजा मुंडे यांनी स्वतः प्रतिक्रिया व्यक्त केली नव्हती, तशीच प्रतिक्रिया अद्याप इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावर देखील त्यांनी व्यक्त केलेली नाही. पण तरी देखील मराठी माध्यमांनी पंकजा मुंडे यांनी नवा पक्ष काढला तर काय होणार??, त्यांचा पक्षाचे नाव काय असणार?? मग त्याचा परिणाम मराठवाड्याच्या आणि पर्यायाने महाराष्ट्राच्या राजकारणावर कसा आणि किती खोलवर होणार??, वगैरे चर्चेचे पतंग उडवायला सुरुवात केली आहे. जणू काही पंकजा मुंडे आज ना उद्या नवा पक्ष काढणार आहेत आणि त्याचा भाजपवर महापालिका निवडणुकांत पासून ते विधानसभा निवडणुकांपर्यंत “प्रचंड मोठा परिणाम” होणारच आहे असेच स्वतःचेच गृहीतक मांडून मराठी माध्यमे आता चर्चा घडवू लागली आहेत.
– जलील यांची नुसतीच वक्तव्ये पुरावे नाहीत!!
वास्तविक पंकजा आणि प्रीतम मुंडे यांना नवा पक्ष काढण्याचा दोनदा प्रस्ताव दिल्याचे वक्तव्य इमतियाज जलील यांनी केले आहे. त्याचा पुरावा त्यांनी दिलेला नाही. किंवा खुद्द पंकजा मुंडे आणि प्रीतम मुंडे यांनी देखील इम्तियाज जलील यांनी असा काही प्रस्ताव दिला असलेला दुजोरा दिलेला नाही. पण फक्त इम्तियाज जलील यांच्याच वक्तव्यावर आधारित मराठी माध्यमांनी स्वयंघोषित आणि स्वयंजाहीर विश्लेषण सुरु केले आहे!!
– मराठी माध्यमांचे अवडंबर
पंकजा मुंडे यांना विधान परिषदेची उमेदवारी मिळाली नाही हा त्यांच्यावर अन्याय आहे असे स्वतःच मराठी माध्यमांनी मध्यंतरी जाहीर केले होते. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांनी काही ठिकाणी निदर्शने केली. परंतु त्याचे मोठे अवडंबर मराठी माध्यमांनी माजविले होते.
आता त्यापलिकडे पाऊल टाकून केवळ इम्तियाज जलील यांच्या वक्तव्याचा आधारे पंकजा मुंडे यांच्या नव्या पक्षाचे पतंग मराठी माध्यमे उंच उंच उडवताना दिसत आहेत. पण मग पंकजा मुंडे स्वतः या कोणत्याही चर्चेवर प्रतिक्रिया व्यक्त न करता या चर्चांना राजकीय हवा देत आहेत ही चर्चांकडे पूर्ण दुर्लक्ष करून आपल्या कामावर त्यांनी पूर्णपणे कॉन्सन्ट्रेशन केले आहे??, हे येणारा काळच सांगेल!!
Pankaja new party is just Imtiaz’s money
महत्वाच्या बातम्या
- MPSC : राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय; वयोमर्यादेत राहुन कितीही वेळा देता येणार परीक्षा!!
- राष्ट्रपती निवडणूक : शरद पवारांच्या नकारानंतरही शिवसेनेचा त्यांच्याच नावाचा आग्रह; राज्यसभा निवडणुकीतला बदला??
- Donald Trump Birthday : भारतातील या मोठ्या शहरांत आहे ट्रम्प यांचा व्यवसाय, 2013 पासून झाली निवासी प्रकल्पांना सुरुवात
- तीन आंदोलनांच्या तीन गोष्टी : भाजप ते काँग्रेस व्हाया राष्ट्रवादी; पाणी ते नेत्यांचा कथित अपमान!!