विशेष प्रतिनिधी
परळी : माजी मंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. परळी मध्ये राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष नामदेवराव आघाव यांच्यासह 5 संचालकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. यावेळी राष्ट्रवादीचे नेते व बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित होते. भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्यासाठी ही एक मोठी धक्कादायक बातमी आहे.
Pankaja munde in big trouble! Vidyaman sugar factory vice president along with 5 other people joins NCP
धनंजय मुंडे यांनी यावेळी प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, या प्रवेश प्रक्रियेमुळे संघटनेत आणि आम्हाला बळ मिळणार आहे. 2012 मध्ये झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये माझा पराभव झाला होता पण आज परळी पंचायत समिती, परळी मार्केट समिती आणि सर्व स्थानिक स्वराज्य संस्था या राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत.परळी मधील लोकांनी मातीतल्या माणसाला पाठिंबा दिल्यामुळेच हे सर्व शक्य होऊ शकले, असे देखील ते म्हणाले.
या कार्यक्रमात भाजपवर टीका करता जयंत पाटील म्हणाले की, शेतकर्यांना थोडा फायदा मिळू लागला तर भाजपचा पोटामध्ये दुखू लागतं. महागाई वाढवून सामान्य लोकांना वेठीस धरले जात आहे. दिल्लीत सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट अंतर्गत पंतप्रधान मोदी यांच्या साठी आलिशान घर बांधले जात आहे. याची खरंच गरज आहे का? असा सवाल देखील जयंत पाटील यांनी या वेळी उपस्थित केला आहे.
मराठवाड्यामध्ये सध्या प्रचंड पाऊस होत असून शेतीमालाचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान होताना दिसून येत आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी पंचनामे करण्याचे आदेश देखील दिले आहेत. शासनाकडून नुकसानभरपाई देण्याची हमी या वेळी जयंत पाटील यांनी मराठवाड्यामधील शेतकर्यांना दिली आहे.
Pankaja munde in big trouble! Vidyaman sugar factory vice president along with 5 other people joins NCP
महत्त्वाच्या बातम्या
- मनी लाँडरिंग प्रकरणात ईडीची मोठी कारवाई, शिवसेनेच्या खासदार भावना गवळींच्या जवळच्या सहकारी सईद खानला अटक
- उरीमध्ये दहशतवादावर प्रहार, भारताच्या लष्कराने पाक घुसखोराला पकडले, 5 दिवसांत 4 दहशतवादी यमसदनी
- ‘पांचजन्य’ने अमेझॉनला केले लक्ष्य, ईस्ट इंडिया कंपनी 2.0 म्हणून उल्लेख, लघु उद्योगांवरील परिणाम केले उघड
- पक्षात लोकांना आणण्यासाठी काँग्रेसची धडपड, तामिळनाडूच्या जिल्हाध्यक्षांचे कार्यकर्त्यांना सोन्याचे आमिष, ‘लोकांना आणा अन् सोने जिंका!’
- BJP-SHIVSENA : शिवसेनेला भाजपची सोडवेना साथ-पुन्हा घातली साद ! ‘भावी’ काळात एकत्र औरंगाबाद महापालिकेत शिवसेना-भाजप युतीचे संकेत