विशेष प्रतिनिधी
मुंबई : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरणावरुन राज्यभरात संताप असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री मंत्री धनंजय मुंडे पूर्ण घेरले गेलेत. बीडमध्ये राष्ट्रवादी नावाच्या प्रवृत्तीने धुमाकूळ घातल्याबद्दल सर्वपक्षीय नेते धनंजय मुंडे यांना जबाबदार धरत आहेत. त्यांचा मंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा. या प्रकरणाचा तपास पूर्ण होईपर्यंत त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे. अशात पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया व्यक्त केली.
पंकजा मुंडे म्हणाल्या :
माझ्या बीडमधील एका तरुणाची निर्घण हत्या झाली याचा मला सर्वात अधिक दु:ख आहे. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून सर्वात प्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून SIT लावण्याची मागणी मी केली. माझा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. त्यांनी विधानसभेमध्ये उत्तर दिलं होतं की, या प्रकरणात कोण मोठा कोण लहान असो कोणीही असो दोषीला शिक्षा देण्यासाठी मागेपुढे पाहणार नाही, असं सांगितलं होतं. ते बीडचे पर्यावरण नक्की सुधारतील.
जेव्हा आपल्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, दोषीला कठोर शिक्षा करुन आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देऊ असं म्हटलं असताना. मी एक मंत्री आहे, मी परत या विषयावर वारंवार काय बोलायचं? आम्ही त्यांच्यावर विश्वास दाखवला पाहिजे, या तपासाबद्दल सकारात्मक राहिला पाहिजे. जर एवढ्यानंतरही आम्ही या प्रकरणात सतत प्रश्न उपस्थिती करत राहू आणि मोर्चे काढू तर हा सरकारवर विश्वास नाही, असं दर्शविलं जाईल. माझ्या मनात कुठलंही प्रश्नचिन्ह नाही की, गृहमंत्री यात कुठल्याप्रकारची गय करतील. माझ्या मनात जर पूर्ण विश्वास आहे, तर रोज रोज या विषयावर बोलाव अशी माझी मानसिकता नाही.
माझ्या राजकीय प्रवास पाहा मी कधी कुठल्या विषयातून वेगळा विषय काढून राजकारण करणे हा माझा स्वभाव नाही. माझ्या मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी जेव्हा शब्द दिलाय. त्यांनी शब्द दिल्यावरही आम्ही प्रश्न उपस्थितीत करत असू तर आमचं आमच्या नेतृत्वावर विश्वास नाही असं दिसून येईल.
जेव्हा ही हत्या झाली तेव्हा मी तिथे उपस्थितीत होती का? जर मी तिथे नव्हती तर मी कोणाचं नाव घेऊन का आरोप करु? संतोष देशमुख माझ्या कार्यकर्त्या होता. त्याचा लेकरबाळांचा चेहरा पाहून मला काय वाटतं आहे, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला मला भेटू पण दिलं नाही. फक्त मलाच या भेटीपासून वंचित ठेलवं. या प्रकरणात मी बोलत नाहीय, असा जो आरोप होतोय त्यात काही तथ्य नाही.
गेल्या 5 वर्षांपासून मी महाराष्ट्राच्या राजकारणापासून दूर आहे. मी मध्य प्रदेशची सहप्रभारी आहे. साधी आमदार नाही, साधी जिल्हा परिषद सदस्य नाही. मग मी यामध्ये काय उत्तर देऊ? कोण अधिकारी कोणाचे आहेत, कोण अधिकारी कुठून आलेत, हे मी आणलेत का? तेव्हाच्या मुख्यमंत्र्यांनी, तेव्हाचा उपमुख्यमंत्र्यांनी, तेव्हाच्या पालकमंत्र्यांनी आणि तेव्हाच्या यंत्रणेनी ते आणलेत. ते देखील म्हणतात की, यात तपास लागला पाहिजे, आरोपीचा शोध लागला पाहिजे. माझ्या संतोष देशमुखला ज्या दिवशी न्याय मिळेल, तो दिवस माझ्यासाठी उज्ज्वल असेल.
Pankaja Munde has full faith in the Chief Minister
महत्वाच्या बातम्या
- ब्रिटनमध्ये पाकिस्तान्यांकडून स्थानिकांवर बलात्कार, पंतप्रधानांनी आरोप फेटाळले, मस्क म्हणाले- स्टार्मर यांना तुरुंगात पाठवा
- Justin Trudeau : भारतद्वेष्टे आणि खलिस्तानीप्रेमी जस्टिन ट्रूडो यांची अखेर गच्छंती, पंतप्रधानपदाबरोबर पक्षाचे नेतेपदही गेले
- Raju Shetty संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित ऊसतोड मजूर पुरवणारे मुकादम, राजू शेट्टी यांची माहिती