प्रतिनिधी
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजा मुंडे यांनी आपल्या समर्थकांसमोर भाषण केल्यानंतर त्या भाषणात केलेल्या वक्तव्यांचे खुलासे पत्रकार परिषदेत केले. मोदी – शहा – नड्डा हे माझे नेते आहेत. त्यांच्या मनात माझ्याबद्दल चांगल्या भावना आहेत, असा माझा विश्वास आहे, असे वक्तव्य पंकजा मुंडे यांनी समर्थकांसमोर केले होते.pankaja munde creates new contraversy by not taking name of devendra fadanavis as her leader
त्यावर पत्रकार परिषदेत पंकजा यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला, की आपण देवेंद्र फडणवीस यांचे नाव का घेतले नाही, त्यावर पंकजा म्हणाल्या की, “मी राष्ट्रीय स्तरावर काम करते आहे. महाराष्ट्रात पक्षाच्या कोणत्याच पदावर काम करत नाही. त्यामुळे माझे नेते राष्ट्रीय स्तरावरचेच आहेत”, असे सांगून आपली भूमिका स्पष्ट केली.
कार्यकर्त्यांच्या राजीनाम्यावर देखील त्यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. त्या म्हणाल्या, की भाजपा नेत्यांनीही यावर भाष्य केले आहे. आम्ही नाराज नसल्याचे आशिष शेलार, राम शिंदे, प्रविण दरेकर आणि देवेंद्र फडणवीस देखील बोलले आहेत.
आता आणखी कुणी बोलण्याची आवश्यकता नाही. कार्यकर्त्यांनी दिलेले राजीनामे मंजूर केलेले नाहीत. ते मागे घ्यावेत, असेही मी त्यांना सांगितले आहे. याचे कारण ते कार्यकर्ते आपापल्या स्तरावर स्वतःच्या पायावर राजकारणात उभे आहेत. त्यांचे राजीनामे घेऊन, दबावतंत्र करण्याची मला गरज नाही. माझ्या नेत्यांशी माझा व्यवस्थित संवाद आहे.
पंकजा म्हणाल्या, माझे नेते राष्ट्रीय स्तरावरच…
माझ्याविषयी मागच्या दोन तीन दिवसात जी विधान केली गेली ती मी लिहून ठेवली आहेत. त्यामध्ये भाजपातील कोणत्याही नेत्याने नकारात्मक भाष्य केलेले नाही. पण काही नेत्यांनी अशी विधाने केली की पक्षाने काय दिले, हे पंकजा मुंडेंनी लक्षात ठेवावे आणि ते विधान त्या नेत्यांने वारंवार केले.
त्यावर माझ इतकेच म्हणणे आहे की पक्षाने मला जे दिले आहे ते मी लक्षात ठेवेन, पण पक्षाने फक्त मलाच दिले नाही. अनेकांना दिले आहे. मग मलाच दिल्याचे सतत का बोलून दाखवले जात आहे”, असा सवाल पंकजा यांनी केला.
त्यावर पत्रकारांनी पंकजा यांना आपण फक्त मोदी, शाह आणि नड्डा यांची नावे घेतलीत, मग देवेंद्र फडणवीसांचे नाव का नाही घेतले? असा प्रश्न विचारला. त्यावर पंकजा म्हणाल्या, की मी राष्ट्रीय स्तरावर काम करते आहे. महाराष्ट्रात पक्षाच्या कोणत्याच पदावर काम करत नाही. त्यामुळे माझे नेते राष्ट्रीय स्तरावरचेच आहेत.
पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतरही महाराष्ट्र भाजपमध्ये नव्या राजकीय ठिणग्या पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पंकजा यांनी सूचक भाषा वापरून आपल्या समर्थकांना काही वेगळे सूचित केल्याचे बोलले जाऊ लागले आहे.
pankaja munde creates new contraversy by not taking name of devendra fadanavis as her leader
महत्त्वाच्या बातम्या
- मंत्रिमंडळ समित्यांमध्ये बदल : राणे, ज्योतिरादित्य आणि अश्वनी वैष्णव यांना या समित्यांमध्ये मिळाले स्थान
- नाशकात हिंदू तरुणीच्या मुस्लिम तरुणाशी लग्नाची पत्रिका व्हायरल, दबावानंतर विवाह सोहळा रद्द
- 8 कोटींच्या रोल्स रॉइसचे मालक बिल्डर संजय गायकवाड, 35 हजारांच्या वीज चोरीप्रकरणी गुन्हा दाखल
- Yashpal Sharma Death : 1983च्या विश्वविजेत्या संघाचे सदस्य यशपाल शर्मा यांचे निधन, अशी होती त्यांची क्रिकेट कारकीर्द