- भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन संसर्ग झाला आहे . Pankaja Munde contracted Omicron
विशेष प्रतिनिधी
मुंबई : भाजप नेत्या आणि राष्ट्रीय सरचिटणीस पंकजा मुंडे यांना ओमिक्रॉन संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. पंकजा मुंडे यांनी 1 जानेवारीला कोरोना संसर्ग झाल्याची माहिती ट्विट करुन दिली होती. कोरोनाची लागण झाल्यानंतर संपर्कात आलेल्या सर्वांनी चाचणी करुन घ्यावी आणि काळजी घेण्याचं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं होतं. पंकजा मुंडे या सध्या मुंबईतील निवासस्थानी क्वारंटाईन आहेत.
पंकजा मुंडे यांना दुसऱ्यांदा कोरोना
पंकजा मुंडे यांना यापूर्वी देखील कोरोना विषाणू संसर्ग झाला होता.त्या दुसऱ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह आल्या आहेत. यापूर्वी एप्रिल 2021 मध्ये पंकजा मुंडे या कोरोना पॉझिटिव्ह आल्या होत्या.
दरम्यान सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी बहिण पंकजा मुंडे यांना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. दुसऱ्यांदा कोरोना झाल्यानंतर पोस्ट कोविडची काळजी फार महत्त्वाची असून नंतर खूप त्रास होतो असेही ते म्हणाले आहेत.
Pankaja Munde contracted Omicron
महत्त्वाच्या बातम्या
- माजी पत्नीनेच काढली लाज, म्हणाल्या हाच काय तो इम्रान खान यांचा नवा पाकिस्तान
- दारूचे ठेके देण्यासाठी अरविंद केजरीवाल यांनी घेतली ५०० कोटी रुपये लाच, जुने सहकारी कवी कुमार विश्वास यांचाच आरोप
- राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या आमदाराला पोलीसांचा दणका, पोलीस ठाण्यात अश्लिल शिवीगाळ केल्याप्रकरणी अटक
- तर, समीर वानखेडे यांच्या थेट नोकरीवरच येणार गदा