• Download App
    Pankaja Munde पंकजा मुंडे "जे" बोलल्याच नाहीत, त्यावरून का झाला वादविवाद??; कुणी केला त्यांचा घात??

    Pankaja Munde पंकजा मुंडे “जे” बोलल्याच नाहीत, त्यावरून का झाला वादविवाद??; कुणी केला त्यांचा घात??

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळातील मंत्री पंकजा मुंडे Pankaja Munde या “जे” बोलल्याच नाहीत, त्यावरून महाराष्ट्रात वादविवाद झाला. पंकजा गेली ५ – ७ टार्गेट झाल्या. राजकीय आयुष्यात त्यांना चढ-उतार सहन करावे लागले. यासंदर्भात त्या आज स्वतःच व्यक्त झाल्या. पण पंकजा मुंडे चे बोलल्याच नव्हत्या त्यावरून वादविवाद झाल्यानंतर त्या संदर्भात खुलासा करायला पंकजांना ७ वर्षे का लागली??, हा सवाल मात्र कायम राहिला.

    आपण जनतेच्या मनातल्या मुख्यमंत्री आहोत, असे पंकजा मुंडे म्हणाल्याचे काही वर्षांपूर्वी माध्यमांनी छापले होते. त्या वक्तव्यावरून त्यांची भाजपमध्ये “बंडखोर” अशी प्रतिमा तयार झाली होती. त्याचवेळी पंकजांनी त्या संदर्भात कुठला खुलासा केला नव्हता, पण आता मात्र त्यांनी पुढे येऊन खुलासा केला.

    लोकसत्ताच्या लोकसंवाद कार्यक्रमात पंकजा मुंडे बोलल्या :

    – मला फक्त ओबीसींचे नाही, सर्व समाजाचे नेतृत्व करायचे आहे. मी निर्भीड आहे, माझ्या हावभावांमुळे मी आक्रमक वाटते. त्यामुळे ‘अँग्री यंग वुमन’ अशी प्रसारमाध्यमांत माझी प्रतिमा निर्माण केली गेली आहे. २००९ मध्ये पक्षाने मला विधानसभेची उमेदवारी दिली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपने माझा स्टार प्रचारकांच्या यादीत समावेश केला, तेव्हा माझ्या बाबांना फार आनंद झाला होता. ते माझ्या आईला म्हणाले होते ‘बघ आपली पंकजा मोदींची स्टार प्रचारक आहे’.

    – २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळाली आणि माझा मंत्रिमंडळात समावेश होऊन ग्रामविकास खात्याची जबाबदारी माझ्याकडे आली. मी मुंबईत लहानाची मोठी झालेली असल्यामुळे या खात्याला मी कसा न्याय देऊ शकेन, असे मला वाटत होते. पण मी झोकून देऊन काम केले. पुढे देवेंद्र फडणवीस यांनी जलसंधारण खात्याचीही जबाबदारी माझ्याकडे दिली. त्याआधी मी एका स्वयंसेवी संस्थेमार्फत बीड परिसरात जलसंधारणाचे मोठे काम (वैद्यानाथ पॅटर्न) केले होते, त्याचीच परिणती पुढे जलयुक्त शिवार योजनेत झाली. यानंतर माझ्याबद्दल नाहक वाद निर्माण केले गेले.

    – “मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री”, हे विधान मी कधीही केले नव्हते. मराठवाड्यातील एका कार्यक्रमात माझ्या अगोदर दिवंगत काँग्रेस नेते राजीव सातव बोलले, तुमच्या रूपाने बहुजन समाजाचा मुख्यमंत्री व्हावा. तुम्ही जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहात, त्यासाठी तुम्हाला शुभेच्छा’, असे राजीव सातव म्हणाले होते. पण ते जणू मीच बोलले आहे असे चित्र माध्यमांनी रंगविले.

    – अगदी अलीकडे आणखी एका वाक्यावरून मला टार्गेट केले गेले. मुंडेसाहेबांवर प्रेम करणाऱ्या लोकांची संख्या इतकी मोठी आहे की, त्यातून एक पक्ष तयार झाला असता, असे वक्तव्य बाबांच्या एका जुन्या सहकाऱ्याने केले होते. मी त्यावर म्हणाले, खरे आहे, एक पक्ष तयार झाला आहे आणि तो पक्ष भाजप आहे. या विधानाला उलट प्रसिद्धी देऊन मी वेगळा पक्ष काढणार वगैरे चर्चा माध्यमांमधूनच सुरू झाली. मी बंडखोर आहे, असे चित्र रंगवले गेले. या अनुभवांपासून धडा घेऊन मी आता खुलून, मोकळेपणाने बोलत नाही.

    Pankaja Munde clerifices her old statements

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    म्हणे, भाजपच्या स्वबळाची शिंदे – अजितदादांना धडकी, पण ही तर मराठी माध्यमांच्या बुद्धीची कडकी!!

    Bihar Maha : महाआघाडीचा जाहीरनामा प्रसिद्ध; 20 महिन्यांत प्रत्येक घरातील एका सदस्याला सरकारी नोकरी देण्याची घोषणा

    Jain Muni : जैन बोर्डिंग जमीन व्यवहारात मूळ चूक ट्रस्टींकडूनच, त्यांनी पापांचे प्रायश्चित्त घ्यावे; जैन मुनी गुप्तीनंद महाराज यांची भूमिका