प्रतिनिधी
मुंबई : आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटेच्या शासकीय महापूजे दरम्यान पांडुरंगाचे मुखदर्शन बंद ठेवण्याची प्रथा शिंदे – फडणवीस सरकार बंद करणार आहे. आता मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणाऱ्या शासकीय महापूजेदरम्यान वारकऱ्यांना पांडुरंगाचे मुखदर्शन घेता येणार आहे. सरकारने हा निर्णय जाहीर केल्याने वारकऱ्यांमध्ये आनंद पसरला असून त्यांनी टाळ मृदुंगाच्या घोषात या निर्णयाचे स्वागत केले आहे. Panduranga will be presented to the people during the official Mahapuja
आषाढी एकादशीच्या दिवशी पहाटे 2.30 नंतर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा केली जाते. त्यादरम्यानच्या काळात सुमारे 4.00 तास पांडुरंगाचे मुखदर्शन बंद ठेवले जाते. त्यामुळे लाखो वारकऱ्यांची गैरसोय होते. ही अडचण लक्षात घेऊन आता शिंदे – फडणवीस सरकारने मुखदर्शन बंद ठेवण्याची परंपरा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
भाजप आमदार प्रसाद लाडांच्या घराबाहेर सापडली सोने – चांदी, पैश्यांनी भरलेली बॅग, तपास सुरू
एकीकडे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पांडुरंगाची शासकीय महापूजा सुरू असताना दुसरीकडे वारकरी पांडुरंगाचे मुखदर्शन घेऊ शकतील, अशी व्यवस्था पंढरपूरच्या मंदिरात सुरू राहील, असा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे सध्या पंढरीच्या वाटेवर असलेल्या वारीमधील वारकऱ्यांमध्ये मोठा आनंद पसरला असून त्यांनी टाळ मृदंगाच्या घोषात शिंदे – फडणवीस सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे.
Panduranga will be presented to the people during the official Mahapuja
महत्वाच्या बातम्या
- मायक्रोन गुजरातमध्ये उभारणार पहिला सेमीकंडक्टर प्लांट; 6,700 कोटींच्या गुंतवणुकीने 5,000 नोकऱ्यांची निर्मिती
- ‘’राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही दिवसांनी टोळीयुद्ध दिसणार’’ आशिष शेलारांचं भाकीत!
- बंगाल के माजी मुख्यमंत्री बुद्धदेव यांची कन्या होणार पुरुष, सुचेतना सेक्स चेंज केल्यानंतर सुचेतन बनणार
- ‘टायटॅनिक’चे अवशेष शोधण्यास गेलेल्या पाणबुडीचा स्फोट, सर्व पाच जणांचा मृत्यू