• Download App
    पाकिस्तानात तालिबानचे उघड उघड समर्थन, अफगाणिस्तानातील विजयाबद्धल मदरशांमध्ये विशेष कार्यक्रम Pakistani madarasas supports taliban

    पाकिस्तानात तालिबानचे उघड उघड समर्थन, अफगाणिस्तानातील विजयाबद्धल मदरशांमध्ये विशेष कार्यक्रम

    विशेष प्रतिनिधी

    इस्लामाबाद – तालिबान संपूर्ण देशाला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत असताना पाकिस्तानच्या इस्लामाबाद येथे मात्र त्याचा उदो उदो केला जात आहे. एका मदरशाच्या गच्चीवर तालिबानचा झेंडा फडकविण्यात आला असून अफगाणिस्तानात तालिबानची सत्ता स्थापन झाल्याने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. Pakistani madarasas supports taliban

    एवढेच नाही तर मदरशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी ‘सलाम तालिबान’ नावाचे गीतही गायले. त्यांनी दहशतवादी संघटनांचे कौतुक केले असून या कार्यक्रमाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.



    पाकिस्तानचे पत्रकार रुहान अहमद यांनी ट्विटरवर व्हिडिओ शेअर केला आहे. त्या व्हिडिओत बुरखा घातलेल्या मुली तालिबानच्या झेंड्याबरोबर ‘सलाम तालिबान’ हे गीत म्हणताना दिसतात. पत्रकार अहमद यांनी म्हटले की, इस्लामाबादच्या लाल मशिदशी संबंधित असलेला मदरसा जामिया हफ्साच्या विद्यार्थिनी या तालिबानची सत्ता आल्याने आनंद व्यक्त करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात गाणे म्हणताना दिसतात.

    अफगाणिस्तानचे पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते हबीब खान यांनी म्हटले की, पाकिस्तानी नागरिकांना अफगाणिस्तानवरील आक्रमणाचा आनंद व्यक्त करू द्या. शेवटी अफगाणी आपल्या जमिनीला स्वातंत्र्य मिळवून देतील आणि हल्लेखोरांना पिटाळून लावतील. लक्षात ठेवा पाकिस्तानचे तुकडे होतील.

    Pakistani madarasas supports taliban

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!