• Download App
    भिंवडीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; १९ विद्यार्थी पोलीसांच्या ताब्यात Pakistan Zindabad slogans in Bhinwadi; 19 students in police custody

    भिंवडीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; १९ विद्यार्थी पोलीसांच्या ताब्यात

    प्रतिनिधी

    भिवंडी : भिवंडी येथे मेरी पाठशाला या संस्थेने सुरू केलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात धक्कादायक प्रकार घडला आहे. आंदोलक विद्यार्थ्यांनी यावेळी पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याने गोंधळ निर्माण झाला. पोलिसांनी यावेळी १९ आंदोलक विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. Pakistan Zindabad slogans in Bhinwadi; 19 students in police custody

    भाषणात पाकिस्तान झिंदाबाद

    भिंवडी येथे गेल्या ३ दिवसांपासून विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या विद्यार्थ्यांना मेरी पाठशाला या संस्थेने पाठबळ दिले आहे. मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी या विद्यार्थ्यांनी महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केले होते. परंतु या आंदोलनादरम्यान एका विद्यार्थ्याने भाषण देताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या. यानंतर याठिकाणी गोंधळ सुरू झाला.

    १९ जण पोलिसांच्या ताब्यात 

    या घडलेल्या प्रकारची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची होऊन पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. यामध्ये आतापर्यंत १४ पुरूष आणि ५ महिला अशा १९ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

    Pakistan Zindabad slogans in Bhinwadi; 19 students in police custody

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस